नौवहन मंत्रालय
आपल्या किनारपट्टीची अपार क्षमता ओळखून, उत्तम भविष्यासाठी ती उपयोगात आणणे आवश्यक : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
Posted On:
05 SEP 2023 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2023
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज भारतीय पोर्ट रेल आणि रोपवे महामंडळाच्या (आयपीआरसीएल) दुसऱ्या रोड शो ला आभासी माध्यमातून संबोधित केले. भारतीय सागरी क्षेत्रविषयक जागतिक शिखर परिषद 2023 (GMIS -23) ची पूर्वपीठिका म्हणून हा रोड शो आयोजित करण्यात आला होता.
आयपीआरसीएलच्या व्यावसायिक भागीदारांना ह्या आभासी रोडशो मध्ये संबोधित करतांना, डॉ श्रीपाद नाईक यांनी सांगितले की, आपल्या किनारपट्टीची अपार क्षमता ओळखून, उत्तम भविष्यासाठी ती उपयोगात आणणे आवश्यक आहे.भारतीय सागरी क्षेत्रविषयक जागतिक शिखर परिषद 2023 ही या क्षेत्राला कलाटणी देणारी घटना ठरेल. या परिषदेमधून, सागरी क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना परस्पर चर्चा, सहकार्य करुन, त्यांचे व्यवसाय आणि ज्ञानवृद्धीसाठी एक निश्चित आराखडा तयार करण्याची संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले. जीएमआयएस-23 साठी वृद्धीच्या क्षमता आणि संधी विषयी सविस्तर माहिती देतांना त्यांनी संगितले की, की परिषद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायक दृष्टिकोनाला मूर्त स्वरूप देण्याची एक संधी आहे.
श्रीपाद नाईक यांनी आयपीआरसीएलच्या महत्त्वाच्या भागधारकांना आणि व्यावसायिक भागीदारांना सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे व्यवसाय प्रदर्शित करण्यासाठी प्रदर्शक म्हणून सहभागी होण्यासाठी या संधीचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित केले. जीएमआयएस-23 मधील त्यांची उपस्थिती ही सागरी आणि संबंधित पायाभूत सुविधांमध्ये भागीदारी आणि नावीन्यपूर्णतेवर भर देणाऱ्या चेतनामय व्यवस्थेला चालना देण्याची वचनबद्धता असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही शिखर परिषद सागरी क्षेत्रात आणि त्याच्याशी संबंधित भागधारक यांना या परिषदेतून गुंतवणुकीच्या विविध संधी आणि आदानप्रदान करण्याच्या कल्पना मांडण्याची संधी मिळेल आणि ही परिषद या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी महत्वाची ठरेल,यावर आयपीआरसीएल चे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गुप्ता, यांनी भर दिला आहे. यातून, सर्वोत्तम पद्धतीना प्रोत्साहन देणे आणि जागतिक सागरी उद्योग क्षेत्र, धोरणकर्ते, गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांना सहकार्य करण्याची संधी मिळेल.
ही परिषद, स्टार्ट-अप, संशोधक, इनक्यूबेटर आणि शैक्षणिक संस्थांना सहयोग करण्यासाठी एक व्यासपीठ देखील प्रदान करेल आणि कुशल स्त्रोतांना विविध संधी प्रदान करेल. ही शिखर परिषद सागरी भारत व्हिजन 2030 तसेच आझादी का अमृत काळ 2047 च्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनासाठी एक पाऊल पुढे जाईल, ज्यामध्ये देशातील बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्गांवर 300 हून अधिक उपक्रमांद्वारे सागरी क्षेत्राच्या वृद्धीसाठी प्रयत्न केले जातील.
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1954984)
Visitor Counter : 129