आयुष मंत्रालय
जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषधांवरील पहिली जागतिक शिखर परिषदेचे फलित अधोरेखित करणारा ‘गुजरात जाहीरनामा’ प्रसिद्ध
"गुजरात जाहीरनामा" -जागतिक वचनबद्धतेची पुष्टी करणारा आणि सर्वांसाठी आरोग्य आणि कल्याण साधण्यासाठी पारंपारिक औषधांच्या क्षमतेचा उपयोग करणारा
Posted On:
04 SEP 2023 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2023
जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषधांवरील पहिली जागतिक शिखर परिषद- 2023 चे फलित दर्शविणारा दस्तऐवज "गुजरात जाहीरनामा" च्या स्वरूपात प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याने स्वदेशी ज्ञान, जैवविविधता आणि पारंपारिक, पूरक आणि एकात्मिक औषधांबाबत जागतिक वचनबद्धतेची पुष्टी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अधोरेखित केले आहे की सर्वांसाठी आरोग्य आणि कल्याणासाठी, पारंपरिक औषधे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, त्यांचे मूल्यमापन करण्यासाठी आणि योग्य तेथे अधिक समग्र, संदर्भयुक्त- विशिष्ट, जटिल आणि वैयक्तिकृत दृष्टिकोन लागू करण्यासाठी कठोर वैज्ञानिक पद्धतींचा वापर आवश्यक आहे.
जामनगर, गुजरात येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषधी केंद्राचे यजमान म्हणून भारताची जागतिक आरोग्य संघटनेची क्षमता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका आहे, ज्यामुळे सदस्य देशांना आणि भागधारकांना शिखर परिषदेतील कृती कार्यक्रम आणि इतर संबंधित प्राधान्ये पुढे नेण्यात मदत केली जाईल.
गांधीनगर, गुजरात येथे आयोजित दोन दिवसीय जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषधांवरील पहिली जागतिक शिखर परिषदचे कृती मुद्दे समिटमध्ये सादर केलेल्या पुरावे, चर्चा आणि परिणामांवर आधारित आहेत. लोकांचे आणि पृथ्वीचे आरोग्य आणि कल्याण, संशोधन आणि पुरावे, जागतिक आरोग्य क्षेत्राची व्याप्ती, प्राथमिक आरोग्य सेवा आणि आरोग्य प्रणाली, डेटा आणि नियमित माहिती प्रणाली, डिजिटल आरोग्य सीमा, जैवविविधता आणि शाश्वतता, मानवी हक्क, समता आणि नैतिकता यासारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी यावेळी सांगितले की “गुजरात जाहीरनामा" ही आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारंपारिक औषध पद्धतीच्या प्राचीन ज्ञानाला चालना देण्याच्या वचनबद्धतेची साक्ष आहे. सर्वांच्या सहयोगी प्रयत्नांद्वारे आणि शाश्वत पद्धतींद्वारे, आम्ही येणाऱ्या पिढ्यांसाठी निरोगी भविष्य सुनिश्चित करू शकतो.”
जागतिक आरोग्य संघटना पारंपारिक औषध जागतिक शिखर परिषदेदरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानॉम गेब्रेयेस म्हणाले होते की "गुजरात जाहीरनामा" विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पारंपारिक औषधांच्या संभाव्यतेचा उपयोग करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि राष्ट्रीय आरोग्य प्रणालींमध्ये पारंपारिक औषधांचा वापर करण्यासाठी आणि पारंपारिक औषधांची शक्ती पोहोचवण्यात मदत करून एकात्मतेवर लक्ष केंद्रित करेल.
गुजरात जाहीरनामा सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती (UHC) आणि सर्व आरोग्य-संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) च्या समर्थनार्थ आणि पुराव्यावर आधारित पारंपारिक पूरक एकात्मिक औषध (TCIM) हस्तक्षेप आणि दृष्टीकोन अधिक लागू करण्यासाठी प्रयत्न वाढविण्याबद्दल भाष्य करतो. जागतिक आरोग्यामध्ये पारंपारिक पूरक एकात्मिक औषधांचे पुराव्यांवर आधारित फायदे वाढविण्यासाठी, जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषधी केंद्राद्वारे जागतिक शिखर परिषदेत प्रदर्शित केलेल्या बहु-प्रादेशिक, बहु-अनुशासनात्मक आणि बहु-भागधारक सहकार्याची भूमिका सांगते जी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख कार्यालयांच्या कार्याशी निगडीत आणि पूरक आहे.
17-18 ऑगस्ट 2023 या कालावधीत गुजरात मधील गांधीनगर येथील पारंपारिक औषधांवरील पहिली जागतिक परिषद जागतिक आरोग्य संघटनेद्वारे आयोजित करण्यात आली होती आणि आयुष मंत्रालयाने सह आयोजकाची भूमिका पार पाडली होती.
* * *
S.Thakur/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1954596)
Visitor Counter : 297