अर्थ मंत्रालय

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) आणि अटल पेन्शन योजने (एपीवाय) अंतर्गत नोंदणीकृत ग्राहकांच्या संख्येनं केला 6.62 कोटींचा टप्पा पार

Posted On: 01 SEP 2023 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2023

राष्ट्रीय पेन्शन (निवृत्ती वेतन) प्रणाली (एनपीएस) आणि अटल पेन्शन योजने (एपीवाय) अंतर्गत एकत्रितपणे नोंदवल्या गेलेल्या ग्राहकांची संख्या 6.62 कोटीच्या पुढे गेली आहे, आणि व्यवस्थापना अंतर्गत एकूण मालमत्ता (एयुएम) रु 10 लाख कोटी इतकी झाली आहे.

Sector

AUM (In Rupees)

Central Government

2,40,902.87

CAB

42,246.13

State Government

4,36,071.72

SAB

63,133.73

Corporate

1,35,218.06

All Citizen Model

47,663.36

NPS Lite

5,157.12

APY

30,051.28

Total

10,00,444.26

पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA), संबंधित जोखीम आणि ट्रेड-ऑफची स्पष्ट समज राखून सदस्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी, पूर्ण माहिती पश्चात निर्णय घेण्यासाठी आणि औपचारिक आर्थिक क्षेत्राच्या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सक्षम बनवण्यासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबवले जातात.

एनपीएस

1 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यानंतर केंद्र सरकारच्या सेवेत रुजू होणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (सशस्त्र दल वगळता) राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) लागू करण्यात आली आहे. त्यानंतर, 1 जून 2015 पासून, अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेने सामाजिक सुरक्षा योजनांना आवश्यक ती गती दिली आहे.

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस (एनपीएस दिवस)

निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती नियोजनाला चालना देण्याच्या उद्देशाने, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA), दरवर्षी 1 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस (NPS दिवस) म्हणून साजरा करते.

हा उपक्रम भारतीय नागरिकांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या टप्प्यात आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यामध्ये हातभार लावतो.

 

 

 

 

S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1954157) Visitor Counter : 121