वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये 8.0% (प्राथमिक) वाढ
जुलै 2023 साठी आठ प्रमुख उद्योगांचा निर्देशांक (आधार वर्ष : 2011-12=100)
Posted On:
31 AUG 2023 6:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2023
आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये 8.0 टक्क्यांनी (तात्पुरती) वाढ झाली आहे. जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये कोळसा, पोलाद, सिमेंट, वीज, रिफायनरी उत्पादने, खते आणि कच्चे तेल यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. वार्षिक आणि मासिक निर्देशांक तसेच वृद्धीदराचा तपशील अनुक्रमे परिशिष्ट I आणि II मध्ये देण्यात आला आहे.
आयसीआय अर्थात आठ प्रमुख उद्योगांचा निर्देशांक कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज या आठ प्रमुख उद्योगांच्या उत्पादनाच्या एकत्रित आणि वैयक्तिक कामगिरीचे मोजमाप आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये (आयआयपी) आठ प्रमुख उद्योगांमधील 40.27 टक्के भारांकाचा समावेश आहे.
एप्रिल 2023 साठी आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाचा वाढीचा अंतिम दर त्याच्या तात्पुरत्या स्तरावरील 3.5 टक्क्यांवरून 4.6 टक्क्यांवर सुधारित करण्यात आला आहे.
आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाचा सारांश खाली दिला आहे:
कोळसा - कोळसा उत्पादन जुलै, 2022 च्या तुलनेत जुलै, 2023 मध्ये 14.9 टक्क्यांनी वाढले. याचा संचयी निर्देशांक एप्रिल ते जुलै, 2023-24 या तिमाहीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 10.1 टक्क्यांनी वाढला.
कच्चे तेल - जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनात 2.1 टक्क्यांनी वाढ झाली. संचयी निर्देशांकात एप्रिल ते जुलै, 2023-24 या तिमाहीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 1.0 टक्क्यांनी घट झाली.
नैसर्गिक वायू - जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये नैसर्गिक वायूचे उत्पादन 8.9 टक्क्यांनी वाढले. याचा संचयी निर्देशांक एप्रिल ते जुलै, 2023-24 या तिमाहीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 2.3 टक्क्यांनी वाढला.
पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादने - जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादनात 3.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा संचयी निर्देशांक एप्रिल ते जुलै, 2023-24 या तिमाहीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 2.3 टक्क्यांनी वाढला.
खते - जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये खत उत्पादनात 3.3 टक्क्यांनी वाढ झाली. याचा संचयी निर्देशांक एप्रिल ते जुलै, 2023-24 या तिमाहीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 9.1 टक्क्यांनी वाढला.
पोलाद - जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये पोलाद उत्पादनात 13.5 टक्क्यांनी वाढ झाली. याचा संचयी निर्देशांक एप्रिल ते जुलै, 2023-24 या तिमाहीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 15.3 टक्क्यांनी वाढला.
सिमेंट - जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये सिमेंट उत्पादन 7.1 टक्क्यांनी वाढले. याचा संचयी निर्देशांक एप्रिल ते जुलै, 2023-24 या तिमाहीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 11.2 टक्क्यांनी वाढला.
वीज - जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये वीज निर्मितीत 6.9 टक्क्यांनी वाढ झाली. याचा संचयी निर्देशांक एप्रिल ते जुलै, 2023-24 या तिमाहीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 2.7 टक्क्यांनी वाढला.
परिशिष्ट I आणि II
* * *
R.Aghor/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1953808)
Visitor Counter : 105