रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय महामार्ग 301 वरील कारगिल-झांस्कर इंटरमीडिएट लेनचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Posted On: 31 AUG 2023 1:24PM by PIB Mumbai

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली की, लडाखमध्ये राष्ट्रीय महामार्ग 301 वरील कारगिल-झांस्कर इंटरमीडिएट लेनचे अद्ययावतीकरण केले जात आहे.

गडकरी ट्विट संदेशात म्हणाले की, या प्रकल्पाची एकूण लांबी 31.14 किलोमीटर असून ती पॅकेज-6 अंतर्गत येते. याचा मुख्य उद्देश प्रवासी आणि अंतर्गत भागात मालाची वाहतूक या दोन्हींसाठी विश्वासार्ह आणि सुलभ दुवा प्रदान करून या भागातील आर्थिक वाढीस चालना देणे हा आहे.

सुधारित महामार्गामुळे वर्षभर वाहतूक सुलभता सुनिश्चित होईल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणि या भागातील रहिवाशांना मोठा फायदा होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हा महत्वाकांक्षी प्रकल्प लडाख प्रदेशात जलद, त्रासमुक्त आणि पर्यावरणाविषयी सजगता साध्य करण्यासाठी समर्पित असल्याचे गडकरी म्हणाले.

****

S.Thakur/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1953707) Visitor Counter : 145