गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
युवा- भारताचे स्वच्छता दूत
स्वच्छतेसाठी जन झेड आणि जन अल्फा
प्रविष्टि तिथि:
30 AUG 2023 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2023
“भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. एक असा देश, ज्याची 65% लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे, एक असा देश, ज्याच्या तरुणाईमध्ये अफाट सामर्थ्य आहे, ज्यांच्या बोटांमध्ये संगणकाद्वारे जगाशी जोडले जाण्याचे कौशल्य आहे, एक असा देश, जिथल्या तरुणांनी स्वतःचे भविष्य घडवण्याचा निर्धार केला आहे, त्या देशाला आता मागे वळून पाहण्याची गरज नाही.”
- पंतप्रधान नरेंद्र मोदी

आधुनिक युगात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्यासाठी जन झी/झेड (Gen Z), अर्थात युवा पिढी उल्लेखनीय आणि नाविन्यपूर्ण भूमिका बजावत आहे. त्यांचे सक्रिय उपक्रम आणि सृजनशील उपाय पर्यावरण संरक्षणाप्रती त्यांचे समर्पण प्रतिबिंबित करणारे आहेत. “स्वच्छते”च्या मार्गावर झपाट्याने प्रगती करत असताना, जन झेडची चपळता आणि तंत्रज्ञान स्नेही वृत्ती, त्यांना समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि अधिक शाश्वत भविष्य साकारण्यासाठी सक्षम करत आहे. तर, जन अल्फा म्हणजे शालेय वयातील युवा पिढीत, स्वच्छतेप्रती उल्लेखनीय जागरुकता दिसते आहे, तसेच तंत्रज्ञानाला नवोन्मेषाची जोड देण्यात ते पटाईत आहेत.

नव्या पिढीतील या नव्या दृष्टिकोनाला अधिक वाव देण्यासाठी, गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने ‘इंडियन स्वच्छता लीग’, ‘स्वच्छता के दो रंग’ सारखे उपक्रम हाती घेतले आहेत, ज्याचा उद्देश भारतातील तरुणांना स्वच्छतेसाठीच्या लोकचळवळीत सहभागी करून घेणे हा आहे. या व्यतिरिक्त, गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने 2022 मध्ये 'स्वच्छ टॉयकॅथॉन' सुरु केले, जे भारतीय खेळणी उद्योगाबाबतच्या विचारांना चालना देते. ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी तसेच गट आणि स्टार्ट-अप्ससाठी असून, गेम आणि खेळण्यांचे डिझाइन आणि पॅकेजिंगमध्ये नवोन्मेष आणि पुनर्वापर, पुनर्निमिती आणि शाश्वततेला चालना देणे हे याचे उद्दिष्ट आहे. या स्पर्धेत पर्यावरण पूरक खेळण्यांचे मूळ नमुने (प्रोटोटाईप), टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली खेळणी आणि या उद्योगासाठीच्या नवीन कल्पना मांडल्या गेल्या.
वंचित समाजातील मुलांनाही खेळण्यासाठी खेळणी उपलब्ध असावीत, यासाठी टॉयबँक सारख्या संस्था जुन्या आणि टाकून दिलेल्या खेळण्यांचा पुनर्वापर करत आहेत. घरातील टाकाऊ वस्तूंचे खेळण्यांमध्ये रूपांतर केले जात आहे ज्यातून मुलांना विज्ञान आणि टिकाऊपणाची मूलभूत तत्त्वे शिकवली जातात. स्वच्छतेच्या या लढ्याला प्रोत्साहन देण्यासाठी, जुलै 2023 मध्ये, कर्नाटकातील असंख्य शहरी स्थानिक संस्थांनी इको-क्लबच्या माध्यमातून शाळांना सहभागी करून घेतले आणि राज्याच्या "प्लास्टिक मुक्त मोहिमेचा" भाग म्हणून प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर विविध उपक्रम सुरू केले. हेब्बागोडी सीएमसी येथे योग्य कचरा विलगीकरण आणि एकल वापर प्लास्टिक मुक्त अभियानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांसह रिड्यूस, रियूज, रिसायकल (RRR) संकल्पना प्रत्यक्षात आणणे हा यापैकी एक उल्लेखनीय प्रयत्न होता.

उत्तराखंड इथल्या 'वेस्ट वॉरियर्स' या स्वयंसेवी संस्थेने शहर स्वच्छतेमध्ये युवकांना सहभागी करून घेण्यासाठी 'ग्रीन गुरुकुल' कार्यक्रम सुरू केला. 100 पेक्षा अधिक शाळांमध्ये कार्यरत या उपक्रमामुळे 39,000 पेक्षा जास्त विद्यार्थी प्रभावित झाले आणि ते शाश्वत कचरा व्यवस्थापनात सहभागी झाले.
2014 मध्ये प्रारंभ झाल्यापासून, ‘युथ फॉर परिवर्तन’ ने 400 हून अधिक ब्लॅक-स्पॉट्सचे पुनरुज्जीवन करणारा "क्लीन बंगळुरू" कार्यक्रम सुरू केला ज्याचा मन की बातच्या 93 व्या भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उल्लेख केला होता. त्यांच्या "रीसायक्लोथॉन" मोहीमे अंतर्गत उन्हाळ्यात वापरलेल्या वह्या गोळा केल्या जातात, न वापरलेल्या पानांवर पुनर्प्रक्रिया करून या नवीन वह्या ग्रामीण कर्नाटकातील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना वितरित केली जातात.

2014 पासून, ब्यतारानापुरा, येलाहंका येथील सत्या फाऊंडेशन या युवा गटाने, "ट्रॅशोनॉमिक्स" नावाचा एक अभ्यासक्रम सुरू केला आहे, जो तरुण राजदूतांद्वारे शाळांमध्ये कचऱ्याला एक संसाधन समजून त्याचे व्यवस्थापन करणे शिकवले जाते. कचऱ्याचे संसाधनांमध्ये रूपांतर करण्यासाठी मुले कंपोस्टिंग, अपसायकलिंग आणि 3Rs (रिड्यूस-पुनर्वापर-रीसायकल) शिकतात.

2020 पासून, गुजरातमधील डॉ. बिनिश देसाई या युवकाने कोविड-संबंधित जैव-वैद्यकीय कचऱ्याचे प्रगत पी-ब्लॉक विटांमध्ये रूपांतर करून त्याचा पुनर्वापर सुरू केला आहे. पी-ब्लॉक 2.0 हे त्यांचे नवं संशोधन असून वजनाला हलके, मजबूत आणि बहुउपयोगी आहे.
* * *
R.Aghor/Rajshree/Sushma/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1953505)
आगंतुक पटल : 251