उपराष्ट्रपती कार्यालय
ओणमच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींचा राष्ट्राला संदेश
प्रविष्टि तिथि:
28 AUG 2023 5:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2023
ओणमच्या शुभ प्रसंगी मी आपल्या देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि शुभकामना व्यक्त करतो.
ओणम हा एकतेचा, सुगीचा आणि सांस्कृतिक समृद्धीचा उत्सव असून हा सण समुदायांना परंपरांच्या धाग्यांमध्ये बांधून ठेवतो.
महान राजा महाबली यांच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो, हा सण परोपकार, करुणा आणि त्याग या कालातीत मूल्यांचे मार्मिक स्मरण करून देतो. या निमित्ताने आपल्या शेतकरी समुदायाच्या अथक परिश्रमांचा सन्मान आणि निसर्गाच्या कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.
ओणम सण सर्वांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो.
* * *
S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1952968)
आगंतुक पटल : 188