वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
G20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्ताने, इंग्लंडच्या व्यापार मंत्री केमी बडेनोच आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्यात झालेल्या बैठकीमुळे द्विपक्षीय व्यापार संबंधांना मिळाली चालना
Posted On:
27 AUG 2023 7:35PM by PIB Mumbai
राजस्थानमध्ये जयपूर इथे G20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्र्यांच्या बैठकीनंतर (टी आय एम एम), वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पियूष गोयल आणि इंग्लंडच्या व्यापार मंत्री केमी बडेनोच यांच्यात 26 ऑगस्ट 2023 रोजी दिल्लीत, सध्या सुरु असलेल्या भारत-इंग्लंड मुक्त व्यापार करार प्रक्रियेचा (एफ टी एम) आढावा घेण्यासाठी बैठक झाली. अनेक मुद्द्यांना अंतिम स्वरूप दिलेल्या वाटाघाटींच्या मागील 12 फेऱ्यांबद्दल समाधान व्यक्त करत, वाटाघाटींच्या पुढील फेऱ्या देखील अशाच प्रकारे यशस्वी होतील असा ठाम विश्वास, दोघांनीही व्यक्त केला. दोन्ही बाजूंच्या मुख्य प्रतिनिधींनी मंत्र्यांना, सद्यस्थिती, ठरावासाठी थकीत असलेले मुद्दे आणि ते मार्गी लावण्यासाठी सातत्याने केलेल्या संयुक्त प्रयत्नांची माहिती दिली. दोन्ही बाजूं कडील मुख्य प्रतिनिधींच्या प्रयत्नांचे कौतुक करत, एकमेकांच्या ईच्छा-आकांक्षा आणि संवेदनशीलता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊन देवाणघेवाणीचा वेग उत्तम राखण्याची इच्छा, दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केली. दोन्ही देशांमध्ये आर्थिक सहकार्य वाढवणाऱ्या नि:पक्ष, संतुलित आणि परस्परांना लाभदायक ठरेल अशा व्यापार कराराला अंतिम स्वरुप देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी आपली ठाम वचनबद्धता व्यक्त केली.
जयपूर इथे जी-20 टी आय एम एम मध्ये भारताला व्यक्त केलेला पाठिंबा आणि घेतलेल्या विधायक सहभागाबद्दल, बडेनोच यांचे, गोयल यांनी आभार मानले. बी-20 परिषद भारत 2023 कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देखील, गोयल यांनी त्यांना आमंत्रित केले. टी आय एम एम बैठकीला भारताचे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल आणि इंग्लंडच्या व्यापार वाटाघाटी महासंचालक अमांडा ब्रूक्स देखील उपस्थित होते. भारत-इंग्लंड व्यापार करारासाठीच्या वाटाघाटी,ऑगस्ट 2023 अखेरपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानंतर या कराराचा उच्चस्तरीय आढावा घेतला जाईल.
***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1952764)
Visitor Counter : 147