कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जपानला तांत्रिक अंतर्वासी प्रशिक्षणार्थी पाठवण्यासाठी भारत सरकारने प्राधिकृत केलेल्या सरकारी संस्थांसोबत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने आयोजित केली कार्यशाळा

Posted On: 26 AUG 2023 1:00PM by PIB Mumbai

 

तांत्रिक अंतर्वासी प्रशिक्षण कार्यक्रम (टीआयटीपी) आणि निर्दिष्ट कुशल कामगार (एसएसडब्ल्यू) कार्यक्रमांतर्गत जपानमध्ये जाणाऱ्या कुशल उमेदवारांच्या संदर्भात जबाबदार असलेल्या भागधारकांमध्ये सर्वसमावेशक संवाद घडवण्यासाठी  आणि ज्ञानाच्या आदानप्रदानाला चालना देण्यासाठी, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने एक कार्यशाळा आयोजित केली होती. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळा  (एनएसडीसी) द्वारे सूचिबद्ध असलेल्या सेंडिंग ऑर्गनायझेशन्स (SOs-जपानला तांत्रिक अंतर्वासी प्रशिक्षणार्थी पाठवण्यासाठी भारत सरकारने प्राधिकृत केलेल्या सरकारी संस्था) सोबत ही विचारमंथन कार्यशाळा घेण्यात आली. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अतुल कुमार तिवारी, या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अनुराग भूषण यांनीही मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकार्‍यांसह कार्यशाळेत भाग घेतला.

तांत्रिक अंतर्वासी प्रशिक्षण कार्यक्रम  (टीआयटीपी) आणि निर्दिष्ट कुशल कामगार  (एसएसडब्ल्यू) कार्यक्रम, भारताला जगाची कौशल्य राजधानी बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे असल्याचे, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अतुल कुमार तिवारी यांनी सांगितले. भारत आणि जपान या  दोन्ही देशांमधील जुने सांस्कृतिक व धार्मिक संबंध आणि सहयोग आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक वृद्धिंगत होण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील बंध अधिक मजबूत होण्यास साहाय्य मिळते. अशा कार्यशाळा आयोजित करणे हे तर्कसंगत अंतर्दृष्टी सामायिक करण्यासाठी महत्वाचे आहे, जे भविष्यासाठी प्रभावी आराखडा तयार करण्यास साहाय्यभूत ठरते, असे तिवारी यांनी सांगितले. आजच्या कार्यशाळेत प्रत्येकाने सामायिक केलेल्या माहितीचा विचार करता आजची चर्चा अत्यंत फलदायी ठरली आहे. पुढची पावले जपानमधील रोजगार बाजाराच्या मागणीनुसार भारतीय कार्यदलाला  प्रशिक्षण देण्यासाठी मंत्रालयाच्या प्रयत्नांना अधिक बळ देतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

दशकानुदशके होणारे  स्थलांतर, एक शक्तिशाली उत्प्रेरक म्हणून विकसित झाले असून  कौशल्य विकास समृद्ध करत सॉफ्ट पॉवरला चालना देत आहे आणि उपजीविकेच्या संधींना प्रोत्साहन देत आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अनुराग भूषण यांनी सांगितले. आपला परदेशातील समुदाय जसजसा वाढत जातो, तसतशी परकीय चलनात वाढ होण्यासोबतच  ज्ञान हस्तांतरण, तंत्रज्ञान आणि कौशल्य संपादनासाठी एक माध्यम उपलब्ध होते.  याचा भारतीय कंपन्यांना त्यांच्या वाढीसाठी जागतिक संधींचा लाभ घेण्यासाठी खूप उपयोग  होतो. लोकसंख्याशास्त्रीय बाबी, लोकशाही आणि स्थलांतराला चालना देणारी विविधता यांच्या अभिसरणातून याचा फायदा घेता येतो. जर्मनी आणि मॉरिशस यांच्यासोबतच्या सर्वसमावेशक स्थलांतर प्रेरणादायी भागीदारी करारयासारख्या धोरणात्मक करारांमधून हे स्पष्ट होते. जपानी बाजारपेठेच्या क्षेत्रात, संधींचा फायदा घेण्यासाठी एक सूक्ष्म दृष्टीकोन अत्यावश्यक  आहे. कर्मचार्‍यांना आवश्यक भाषिक कौशल्यांनी तयार करणे, भाषा प्रशिक्षण आराखडा तयार करणे, इमिग्रेशन धोरण परिसंस्था बळकट करणे आणि डिजिटल प्रगती आत्मसात करणे या बाबी तरुण कर्मचार्‍यांच्या प्रतिभेचा उपयोग करून घेण्यास  मदत करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

'सेंडिंग ऑर्गनाइझेशन्ससह' मौल्यवान माहिती, बाबी जाणून घेण्यात कार्यशाळा यशस्वी ठरली. या माहितीच्या आधारे, मंत्रालयाअंतर्गत काम करणारे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आंतराष्ट्रीय’ - एनएसडीसीआय, एमएसडीई, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि इतर मंत्रालयांमध्ये दुवा साधणारा आराखडा तयार करण्याच्या दिशेने त्यांचे प्रयत्न संरेखित करेल. यामुळे दोन्ही देशांदरम्यान, वरील दोन कार्यक्रमांतर्गत कामगारांची गमनशीलता वाढवतील. अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून, संबंधित मंत्रालयांच्या मदतीने शिकण्याच्या सुविधांचा विस्तार करताना आणि कुशल भारत आंतरराष्ट्रीय केंद्रांना प्रोत्साहन देताना, उच्च कुशल जपानी भाषा प्रशिक्षकांचा एक मोठा समूह तयार करणे महत्त्वाचे मानले गेले. याशिवाय जपानमधील कंपन्या आणि भारतातल्या जपानमधील कंपन्यांशी सहयोगहे मागणी- समन्वय आणि मागणीच्या ज्ञानाच्या आधारे संबंधित क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षणाचे संरेखन करण्यासाठी आवश्यक पाऊल असेल.

***

M.Pange/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1952518) Visitor Counter : 139


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu