रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
खगोलीय इतिहासात भारताचा गौरवशाली अध्याय कोरल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इस्रोचे अभिनंदन केले
Posted On:
23 AUG 2023 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2023
खगोलीय इतिहासात भारताचा गौरवशाली अध्याय कोरल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे.
ट्विट्सच्या मालिकेत गडकरी म्हणाले की, चांद्रयान-3 च्या चंद्राच्या पृष्ठभागावरील अलगद लँडिंगबद्दल इस्रो मधील प्रतिभावंतांचे, विशेषत: अध्यक्ष एस सोमनाथ, प्रकल्प संचालक पी वीरमुथुवेल आणि मोहीम संचालक मोहना कुमार यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, या यशामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. ते म्हणाले की, अतूट समर्पण, सूक्ष्म नियोजन आणि उत्कृष्ट सांघिक कार्य यांनी अंतराळ संशोधनामधील भारताची ताकद पुन्हा एकदा दिसून आली आहे.
येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी असलेल्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्व भारतीय नागरिकांचे खूप खूप अभिनंदन.
S.Kakade/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1951572)
Visitor Counter : 106