सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चांद्रयान-3 च्या यशात एमएसएमई क्षेत्राने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन

प्रविष्टि तिथि: 23 AUG 2023 9:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2023

केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री नारायण राणे यांनी एका ट्विट द्वारे चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल देशवासियांचे आणि इस्रो अर्थात भारतीय अंतराळ  संशोधन संस्थेच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.

ते म्हणाले की, चांद्रयान-3 चे स्वप्न साकार करण्यामध्ये देशाच्या शास्त्रज्ञांबरोबरच एमएसएमई मंत्रालयाचेही मोठे योगदान आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, एमएसएमई मंत्रालयाअंतर्गत भुवनेश्वर टूल रूमने या मोहिमेसाठी  437 प्रकारचे सुमारे 54,000 एरो-स्पेस घटक तयार केले आहेत. तसेच, मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या IDEMI मुंबई या संस्थेने देखील चांद्रयान-3 साठी सुट्ट्या भागांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या मिशनचे यश भारतासाठी तसेच संपूर्ण जगासाठी फायदेशीर ठरेल, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. देश स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करत आहे, अशा वेळी  या मोहिमेचे यश निश्चितच देशाच्या अवकाश, विज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात नवीन आयाम प्रस्थापित करेल.

केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत अवकाश क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. चरख्यापासून ते चांद्रयानापर्यंत, आज सर्वत्र एमएसएमई क्षेत्र आहे, जे देशाची उत्पादन क्षमता वाढवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. शास्त्रज्ञांचे आभार मानताना ते म्हणाले की, भारताचा अवकाश क्षेत्रामधील कामगिरीचा इतिहास असामान्य आहे. भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्येही एमएसएमई क्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल, असे ते म्हणाले.

 

 

 

 

S.Kakade/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 1951566) आगंतुक पटल : 220
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: हिन्दी , English , Urdu , Telugu