संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय हवाई दलाच्या एलएस तेजस लढाऊ विमानाने गोवा किनारपट्टीजवळच्या समुद्रात स्वदेशी बनावटीच्या अस्त्र बियॉन्ड व्हिज्युअल रेंज (BVR) या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची केली यशस्वी चाचणी

Posted On: 23 AUG 2023 8:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2023

भारतीय हवाई दलाच्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमान (LCA) LSP-7 तेजसने   23 ऑगस्ट 2023 रोजी गोवा किनारपट्टी जवळच्या समुद्रात स्वदेशी बनावटीच्या अस्त्र  बियॉन्ड व्हिज्युअल रेंज (BVR) या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले. सुमारे 20,000 फूट उंचीवर या विमानातून क्षेपणास्त्र सोडण्यात यश मिळाले. या चाचणीची सर्व उद्दिष्टे पूर्ण करणारे हे एक परिपूर्ण  उदाहरण ठरेल.

एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए), संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) चे चाचणी संचालक आणि शास्त्रज्ञ, यांच्यासह सेंटर फॉर मिलिटरी एअरवर्थिनेस अँड सर्टिफिकेशन (CEMILAC) आणि हवाई गुणवत्ता हमी महासंचालक (DG-AQA) यांनी या चाचणी प्रक्षेपणाचे परीक्षण केले. या विमानाचे परीक्षण, देखरेख करणाऱ्या दुसऱ्या एका तेजस ट्वीन सीटर विमानानेही केले.  

अस्त्र (ASTRA) हे अत्याधुनिक हवेतून हवेत मारा करणारे BVR क्षेपणास्त्र, ध्वनीपेक्षा जास्त वेगाच्या हवाई लक्ष्यांना भेदून  नष्ट करते. संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (DRDL), संशोधन केंद्र इमरात (RCI) आणि DRDO च्या इतर प्रयोगशाळा यांनी एकत्रितपणे त्याची निर्मिती आणि विकास केला आहे.  स्वदेशी बनावटीच्या ASTRA BVR क्षेपणास्त्राचे, स्वदेशी तेजस लढाऊ विमानावरून प्रक्षेपण, हे ‘आत्मनिर्भर भारत’ लक्ष्यपूर्तीच्या दिशेने एक महत्वाचे पाउल आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तेजस-एलसीए वरून क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल, ADA, DRDO, CEMILAC, DG-AQA आणि उद्योग यांची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की या प्रक्षेपणामुळे तेजसच्या लढाऊ क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होईल आणि आयात केलेल्या शस्त्रास्त्रांवरील अवलंबित्व कमी होईल. संरक्षण विभागाचे (R&D) सचिव आणि DRDO च्या अध्यक्षांनीही या यशस्वी प्रक्षेपणात सहभागी झालेल्या चमूंचे अभिनंदन केले आहे.

 

 

 

S.Kakade/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1951537) Visitor Counter : 307


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu