ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाविरोधात क्लाउडटेल इंडियाने दाखल केलेली याचिका राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने फेटाळली


क्लाउडटेल इंडियाने गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे उल्लंघन करून ग्राहकांना विकलेले 1,033 प्रेशर कुकर परत मागवावेत, त्याची किंमत ग्राहकांना चुकती करावी आणि याबाबतचा अनुपालन अहवाल 45 दिवसांच्या आत सादर करण्याचे प्राधिकरणाचे निर्देश

Posted On: 23 AUG 2023 4:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2023

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या (सीसीपीए) आदेशाला आव्हान देणारी क्लाऊडटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची याचिका राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (एनसीडीआरसी) फेटाळली आहे. ग्राहकांना घरगुती प्रेशर कुकर विकण्यासाठी अनिवार्य असलेल्या बीआयएस मानकांचे उल्लंघन करून कंपनीने ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी, सीसीपीएने हे आदेश जारी केले होते.

या आदेशानुसार, संबंधित कंपनीने ग्राहकांना विकलेले घरगुती प्रेशर कुकरचे 1,033 नग परत घ्यावेत, परत मागवलेल्या प्रेशर कुकरच्या किमतीची ग्राहकांना परतफेड करावी, आणि याबाबतचा अनुपालन अहवाल 45 दिवसांच्या आत सादर करावा, असे निर्देश सीसीपीएने दिले आहेत. कंपनीने गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे (क्यूसीओ) उल्लंघन आणि ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन करून प्रेशर कुकरची विक्री केल्याबद्दल रुपये 1,00,000 इतका दंड भरावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.    

क्लाउडटेल इंडिया प्रा. ली. ही अमेझॉन बेसिक्स स्टेनलेस स्टील आऊटर लीड प्रेशर कुकर, 4 लिटर या  (शिट्टीद्वारे कुकरमधील हवेच्या दाबाची सूचना न देणारा) प्रेशर कुकरची विक्री करणारी कंपनी आहे. हा प्रेशर कुकर पुढील युआरएल वर अमेझॉन ई-कॉमर्स व्यासपीठावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता: https://www.amazon.in/AmazonBasics-Stainless-Steel-Pressure-Cooker/dp/B071G5KNXK

दिनांक 01.02.2021 रोजी लागू झालेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशांनुसार, घरगुती प्रेशर कुकरना भारतीय मानक (IS) 2347: 2017 चे पालन करणे बंधनकारक आहे, आणि भारतीय मानक ब्यूरोच्या (अनुरूपता मूल्यांकन ) नियंत्रण, 2018 च्या अनुसूची  II च्या योजना -I नुसार भारतीय मानक ब्यूरोच्या (BIS) परवान्याखाली मानक चिन्ह धारण करणे बंधनकारक आहे.

संबंधित प्रकरणात, क्लाउडटेल कंपनी विहित अनिवार्य मानकांचे पालन न करता आणि BIS च्या परवान्याखाली मानक (ISI) चिन्हाशिवाय ग्राहकांना घरगुती प्रेशर कुकर विकत असल्याचे आढळून आले. गुणवत्ता नियंत्रण आदेश लागू झाल्यानंतरही क्लाउडटेलद्वारे भारतातील ग्राहकांना अ-प्रमाणित प्रेशर कुकर विकले जात होते.

क्लाउडटेलने सीसीपीएला दिलेल्या उत्तरात असे म्हटले होते की  गुणवत्ता नियंत्रण आदेश  लागू झाल्यानंतर त्यांनी प्रेशर कुकरची आयात थांबवली होती. मात्र, आयात थांबवल्यानंतरही कंपनीने ग्राहकांना असे प्रेशर कुकर विकणे थांबवले नव्हते, असे सीसीपीएच्या निदर्शनास आले.   खरे तर, गुणवत्ता नियंत्रण आदेशाबद्दल माहिती असूनही, कंपनी  ग्राहकांना असे प्रेशर कुकर मोठ्या प्रमाणात विकत असल्याचे स्पष्ट आढळून आले .

क्लाउडटेलने  राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेतकेंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने जारी केलेल्या आदेशाला आव्हान दिले होते.  राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने  आज ही याचिका फेटाळली.

 

 

 

S.Kakade/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1951404) Visitor Counter : 167


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu