राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान गोवा दौऱ्यावर

Posted On: 21 AUG 2023 9:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 ऑगस्ट 2023

 

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू 22 ते 24 ऑगस्ट 2023 दरम्यान गोव्याला भेट देणार आहेत.

22 ऑगस्ट 2023 रोजी, राष्ट्रपती, गोवा येथील राजभवन येथे त्यांच्या सन्मानार्थ गोवा सरकारने आयोजित केलेल्या नागरी सत्काराला उपस्थित राहतील. या प्रसंगी त्या निवडक लाभार्थ्यांना वनहक्क कायद्यांतर्गत ‘सनद’ वाटपही करणार आहेत.

23 ऑगस्ट 2023 रोजी, राष्ट्रपती गोवा विद्यापीठाच्या 34 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित  राहतील  आणि गोवा राजभवन येथे गोव्यातील आदिवासी समूहाच्या सदस्यांशी संवाद साधतील. त्याच दिवशी त्या पर्वरी येथील गोवा विधानसभेला संबोधित करणार आहेत.

 

* * *

N.Chitale/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1950927)