पंचायती राज मंत्रालय
पंचायत मधील शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेला उद्यापासून श्रीनगरमध्ये होणार सुरुवात
Posted On:
20 AUG 2023 3:05PM by PIB Mumbai
केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने, जम्मू आणि काश्मीर सरकारच्या पंचायती राज आणि ग्रामीण विकास विभागाच्या सहकार्याने, संकल्पना 8 वर आधारित दृष्टिकोन स्वीकारून ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण तसेच पंचायतीमधील सुशासन या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे 21-23 ऑगस्ट 2023 दरम्यान आयोजन केले आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते उद्या या तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन होणार असून यावेळी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील उपस्थित राहतील.
क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण या संदर्भात सर्वोत्तम धोरणे, दृष्टिकोन, त्या अनुषंगाने करावयाच्या कृती आणि नाविन्यपूर्ण मॉडेल्स यांचे प्रदर्शन करणे, तसेच चांगल्या पद्धती, देखरेख व्यवस्थेसंबंधी आराखडा, प्रोत्साहन, आणि ग्रामपंचायत विकास आराखड्यामध्ये (GPDP) शाश्वत विकास उद्दिष्टांसंबंधीच्या (SDGs) संकल्पनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.
पार्श्वभूमी:
संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारलेली शाश्वत विकास उद्दिष्टे 1 जानेवारी, 2016 पासून लागू झाली आहेत. भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने शाश्वत विकास उद्दिष्टांसंबंधी संकल्पना केंद्रित दृष्टिकोन स्वीकारलेला आहे - 'जागतिक योजना’ साध्य करण्यासाठी 'स्थानिक कृती' सुनिश्चित करणे ही या दृष्टिकोनामागची भूमिका आहे.
***
N.Chitale/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1950618)