दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
‘ओव्हर-द-टॉप (ओटीटी) दूरसंचार सेवेसाठी नियामक यंत्रणा आणि निवडक ओटीटी सेवांवर बंदी' बाबत ट्रायच्या सल्लामसलत निवेदनावर टिप्पण्या/प्रति टिप्पण्या प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ
Posted On:
18 AUG 2023 3:09PM by PIB Mumbai
ट्राय (TRAI), अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने 07.07.2023 रोजी 'ओव्हर-द-टॉप (ओटीटी) दूरसंचार सेवेसाठी नियामक यंत्रणा आणि निवडक ओटीटी सेवांवर बंदी घालण्याबाबतचे सल्लामसलत निवेदन जारी केले होते. निवेदनामध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर भागधारकांकडून मागवण्यात आलेल्या लेखी टिप्पण्या प्राप्त करण्याची अंतिम तारीख 04.08.2023, तर प्रति टिप्पण्यांसाठी 18.08.2023 ही तारीख निश्चित करण्यात आली होती.
टिप्पण्या सादर करण्यासाठीची अंतिम मुदत वाढवण्याच्या हितधारकांच्या विनंतीवरून, लिखित टिप्पण्या आणि प्रति-टिप्पण्या सादर करण्याची अंतिम तारीख अनुक्रमे 18.08.2023 आणि 01.09.2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
टिप्पण्या सादर करण्यासाठी आणखी वेळ वाढवण्याची हितधारकांची विनंती लक्षात घेऊन, लेखी टिप्पण्या आणि प्रति-टिप्पण्या सादर करण्याची अंतिम तारीख अनुक्रमे 01.09.2023 आणि 15.09.2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टिप्पण्या/प्रति टिप्पण्या अखिलेश कुमार त्रिवेदी, सल्लागार (नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि परवाना), ट्राय यांना, शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात advmn@trai.gov.in या ईमेल वर पाठवता येतील. कोणतेही स्पष्टीकरण/माहितीसाठी, अखिलेश कुमार त्रिवेदी, सल्लागार (नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि परवाना), ट्राय यांच्याशी दूरध्वनी क्रमांक +91-11-23210481 वर संपर्क साधता येईल.
***
S.Patil/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1950170)
Visitor Counter : 125