दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
“भारतीय विमानतळ प्राधिकरणाव्यतिरिक्त इतर संस्थांतर्फे पुरवण्यात आलेल्या सेवांसाठी विमान आणि ‘ग्राऊंड स्टेशन्स’ दरम्यानच्या डिजिटल दूरसंवाद सेवा” या विषयावरील ट्रायच्या पुरवणी सल्लामसलत पत्रकावर टिप्पण्या/ प्रतिटिप्पण्या पाठवण्याच्या अंतिम मुदतीत वाढ
Posted On:
17 AUG 2023 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2023
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (टीआरएआय)ने 03 ऑगस्ट 2023 रोजी “भारतीय विमानतळ प्राधिकरणाव्यतिरिक्त इतर संस्थांतर्फे पुरवण्यात आलेल्या सेवांसाठी विमान आणि ‘ग्राऊंड स्टेशन्स’ यांच्या दरम्यानच्या डिजिटल दूरसंवाद सेवा” या विषयावरील पुरवणी सल्लामसलत पत्रक जारी केले होते. या पत्रकामध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत विविध संबंधित भागधारकांनी आपापल्या सूचना लिखित स्वरुपात 17 ऑगस्ट 2023 पर्यंत अथवा त्या मजकुराला विरोध करणाऱ्या टिप्पण्या 24 ऑगस्ट 2023 पर्यंत टीआरएआयकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले होते.
उद्योजक संघटनांनी केलेल्या विनंतीवरुन, उपरोक्त पुरवणी सल्लामसलत पत्रकावरील सूचना सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता त्यांना त्यांच्या सूचना लिखित स्वरुपात 24 ऑगस्ट 2023 पर्यंत अथवा प्रतिटिप्पण्या 31 ऑगस्ट 2023 पर्यंत टीआरएआयकडे पाठवता येतील.
या सूचना तसेच प्रतिटिप्पण्या टीआरएआयचे सल्लागार (नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि परवाने) अखिलेश कुमार त्रिवेदी यांच्याकडे advmn@trai.gov.inया ईमेल पत्यावर प्राधान्याने इलेक्ट्रॉनिक स्वरुपात पाठवता येतील. यासंदर्भातील कोणतेही स्पष्टीकरण/माहिती मिळवण्यासाठी कृपया टीआरएआयचे सल्लागार (नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि परवाने) अखिलेश कुमार त्रिवेदी यांच्याशी +91-11-23210481 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1950006)
Visitor Counter : 127