इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर बंगळूरू येथे उद्यापासून सुरु होत असलेल्या जी 20 डिजिटल नवोन्मेष आघाडी परिषदेचे उद्घाटन करणार
जी 20 अंतर्गत डिजिटल अर्थव्यवस्था कार्य गटाच्या (DEWG) चौथ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर डिजिटल नवोन्मेष आघाडी परिषदेचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
16 AUG 2023 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2023
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर बंगळूरू येथे उद्यापासून सुरु होत असलेल्या जी 20 डिजिटल नवोन्मेष आघाडी परिषदेचे उद्घाटन करतील.
डिजिटल अर्थव्यवस्था कार्य गटाच्या (DEWG)चौथ्या बैठकीदरम्यान ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली असून, यावेळी इतर जी 20 देशांच्या प्रतिनिधींसह जागतिक तज्ज्ञ आणि डिजिटल क्षेत्रातील धुरीण उपस्थित राहतील. या परिषदेत ‘डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI)’, ‘डिजिटल अर्थाव्यवस्थेमधील सुरक्षितता’, ‘डिजिटल कौशल्य विकास’ इत्यादी विषयांवर भर दिला जाईल.
या परिषदेच्या पार्श्वभूमीवर, कॉर्पोरेट्स आणि स्टार्टअप्सनी आयोजित केलेल्या नवोन्मेष प्रदर्शनाचे उद्घाटनही केंद्रीय राज्यमंत्री करणार आहेत.
भारताच्या जी 20 अध्यक्षपदाचा एक भाग म्हणून, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्टार्टअप हबअंतर्गत जी 20 डिजिटल नवोन्मेष आघाडी (G20-DIA) उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम सर्व जी 20 देश आणि नऊ आमंत्रित अतिथी देशांच्या, शिक्षण-तंत्रज्ञान, आरोग्य-तंत्रज्ञान, कृषी-तंत्रज्ञान, अर्थ-तंत्रज्ञान, सुरक्षित डिजिटल पायाभूत सुविधा आणि चक्राकार अर्थव्यवस्था या सहा क्षेत्रांमधील स्टार्टअप्सच्या विकासाला चालना देतो.
29 देशांचे एकूण 174 स्टार्टअप या कार्यक्रमाचा भाग आहेत.
18 ऑगस्ट रोजी एका पुरस्कार सोहळ्याने या परिषदेचा समारोप होईल. यामध्ये विविध श्रेणींमध्ये 30 स्टार्टअप्सना सन्मानित केले जाईल.
* * *
S.Kakade/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1949714)
आगंतुक पटल : 194