संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांच्या 76 शौर्य पुरस्कारांना राष्ट्रपतींनी दिली मंजुरी, नऊ जवानांचा मरणोत्तर सन्मान

Posted On: 14 AUG 2023 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्ट 2023

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वर्ष 2023 च्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांच्या 76 शौर्य पुरस्कारांना मंजूरी  दिली आहे. यामध्ये चार कीर्ती चक्र (मरणोत्तर), 11 शौर्य चक्र पुरस्‍कार आहेत. यामध्‍ये पाच जवानांना मरणोत्तर पुरस्कार देण्‍यात येणार आहे. दोन ‘बार टू सेना पदके’  (शौर्य), 52 सेना पदके (शौर्य), तीन नौसेना पदक (शौर्य) आणि चार वायु सेना पदके (शौर्य)  पुरस्काराचा  समावेश आहे.

विविध लष्करी मोहिमांमध्ये  महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल लष्करातील कुत्रा  मधु (मरणोत्तर) आणि एका  वायुसेनेच्या कर्मचार्‍यांसह लष्कराला 30 मेन्शन -इन-डिस्पॅचेस मंजूर केले आहेत.या मोहिमांमध्ये  ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन स्नो लेपर्ड, ऑपरेशन कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन, ऑपरेशन माउंट चोमो, ऑपरेशन पंगसौ पास, ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन ऑर्किड, ऑपरेशन कलिशम व्हॅली, रेस्क्यू ऑपरेशन आणि ऑपरेशन इव्हॅक्युएशन यांचा समावेश आहे.

शौर्य पदक पुरस्कार विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. यादीसाठी येथे क्लिक करावे.

 

* * *

S.Bedekar/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1948721) Visitor Counter : 155