गृह मंत्रालय

स्वातंत्र्यदिन 2023 निमित्त अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल (एचजी) आणि नागरी संरक्षण (सीडी) कर्मचार्‍यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान


महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांचा उलेखनीय सेवेसाठी अग्निशमन सेवा पदकाने सन्मान तर पाच कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदक

Posted On: 14 AUG 2023 5:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्ट 2023

 

राष्ट्रपती शौर्य पदक आणि उल्लेखनीय  सेवांसाठी राष्ट्रपती पदक तसेच शौर्य पदक आणि उत्कृष्ट  सेवा पदके अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी जाहीर केली जातात.

वर्ष 2023 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 53 जवानांचा अग्निशमन सेवा पदके देण्यात आली आहेत.

यापैकी, शौर्य आणि पराक्रम गाजवल्याबद्दल 03 जवानांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा शौर्य पदक  आणि एका  जवानाला अग्निशमन सेवा शौर्यपदक देण्यात आले आहे.  

उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक 8 कर्मचाऱ्यांना आणि उल्लेखनीय  सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक 41 कर्मचार्‍यांना त्यांच्या संबंधित उत्कृष्ट आणि उल्लेखनीय सेवा कामगिरीसाठी देण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांचा  उलेखनीय सेवेसाठी  अग्निशमन सेवा पदकाने सन्मान करण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त, 48 कर्मचारी/स्वयंसेवक  2023 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त  गृहरक्षक  आणि नागरी संरक्षण पदकाचे मानकरी ठरले आहेत. 

उत्कृष्ट  सेवेसाठी राष्ट्रपती गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदक तसेच उल्लेखनीय सेवेसाठी  गृहरक्षक आणि  नागरी संरक्षण पदक अनुक्रमे 05 कर्मचारी / स्वयंसेवक आणि 43 कर्मचारी / स्वयंसेवकांना देण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्रातील पाच कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय  सेवेसाठी गृहरक्षक  आणि नागरी संरक्षण पदके देण्यात आली आहेत.

अग्निशमन सेवा पदके आणि गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदक विजेत्यांची यादी परिशिष्टात जोडली आहे

अग्निशमन सेवा पदकांच्या यादीसाठी येथे क्लिक करा  

गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदकांच्या  यादीसाठी येथे क्लिक करा

 

* * *

S.Bedekar/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1948634) Visitor Counter : 120