मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्त (26 नोव्हेंबर 2023 रोजी) राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2023 चे होणार वितरण


दूध उत्पादक शेतकरी, दूध सहकारी संस्था/एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार देण्यात येतात

Posted On: 11 AUG 2023 3:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2023

केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील पशुपालन आणि दुग्धविकास विभागाने वर्ष 2023 साठीच्या गोपाल रत्न पुरस्कारांसाठी https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर 15.08.2023 पासून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका पुरवता यावी म्हणून केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील पशुपालन आणि दुग्धविकास विभागातर्फे पशुपालन आणि दुग्धविकास क्षेत्रात परिणामकारक विकास घडवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. भारतातील देशी जातींच्या गायी-म्हशी सशक्त आहेत आणि त्यांच्यात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावण्याची जनुकीय क्षमता आहे. शास्त्रीय पद्धतीने देशी गायींच्या प्रजातींचे जतन आणि विकसन करण्याच्या उद्देशाने देशात डिसेंबर 2014 मध्ये प्रथमच राष्ट्रीय गोकुळ अभियान(आरजीएम) सुरु करण्यात आले.

आरजीएम अभियानाअंतर्गत, दूध उत्पादक शेतकरी, दूध सहकारी संस्था/शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) तसेच कृत्रिम रेतन तज्ञ (एआयटीएस) यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 2023 या वर्षासाठी खालील विभागांसाठी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारांची घोषणा केली आहे:

  1. देशी गाई अथवा म्हशींचे पालन करणारा  सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी (नोंदणीकृत जातींची यादी सोबत जोडली आहे)
  2. सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक सहकारी संस्था (डीसीएस)/ दूध निर्मिती कंपनी (एमपीसी)/दूध निर्मात्या शेतकऱ्यांची उत्पादक संघटना (एफपीओ).
  3. सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी).

 राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2023 प्राप्त पहिल्या दोन विभागांसाठी म्हणजेच सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी आणि सर्वोत्कृष्ट डीसीएस/ एफपीओ/ एमपीसी यांना गुणवत्ता प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि खालील रोख रक्कम दिली जाईल:

  • प्रथम क्रमांक – रु.5,00,000/- (पाच लाख रुपये)
  • द्वितीय क्रमांक- रु.3,00,000/-(तीन लाख रुपये)

सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी) विभागासाठी पहिल्या तिन्ही क्रमांकांच्या पुरस्कारामध्ये केवळ गुणवत्ता प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह  यांचा समावेश असेल.

राष्ट्रीय दुग्ध दिनी (26 नोव्हेंबर 2023) या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. या पुरस्कारांसाठी आवश्यक पात्रता आणि  ऑनलाईन अर्ज प्रक्रिया इत्यादी बाबींचे तपशील जाणून घेण्यासाठी  https://awards.gov.in  किंवा  https://dahd.nic.in संकेतस्थळांना भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गायींच्या नोंदणीकृत जाती (एनजीआरए 2023 साठी)

S.N.

Breed

Home Tract

1

Amritmahal

Karnataka

2

Bachaur

Bihar

3

Bargur

Tamilnadu

4

Dangi

Maharashtra and Madhya Pradesh

5

Deoni

Maharashtra and Karnataka

6

Gaolao

Maharashtra and Madhya Pradesh

7

Gir

Gujarat

8

Hallikar

Karnataka

9

Hariana

Haryana, Uttar Pradesh and Rajasthan

10

Kangayam

Tamilnadu

11

Kankrej

Gujarat and Rajasthan

12

Kenkatha

Uttar Pradesh and Madhya Pradesh

13

Kherigarh

Uttar Pradesh

14

Khillar

Maharashtra and Karnataka

15

Krishna Valley

Karnataka

16

Malvi

Madhya Pradesh

17

Mewati

Rajasthan, Haryana and Uttar Pradesh

18

Nagori

Rajasthan

19

Nimari

Madhya Pradesh

20

Ongole

Andhra Pradesh

21

Ponwar

Uttar Pradesh

22

Punganur

Andhra Pradesh

23

Rathi

Rajasthan

24

Red Kandhari

Maharashtra

25

Red Sindhi

On organized farms only

26

Sahiwal

Punjab and Rajasthan

27

Siri

Sikkim and West Bengal

28

Tharparkar

Rajasthan

29

Umblachery

Tamilnadu

30

Vechur

Kerala

31

Motu

Orissa,Chhattisgarh and Andhra Pradesh

32

Ghumusari

Orissa

33

Binjharpuri

Orissa

34

Khariar

Orissa

35

Pulikulam

Tamilnadu

36

Kosali

Chhattisgarh

37

MalnadGidda

Karnataka

38

Belahi

Haryana and Chandigarh

39

Gangatiri

Uttar Pradesh and Bihar

40

Badri

Uttarakhand

41

Lakhimi

Assam

42

Ladakhi

Jammu and Kashmir

43

Konkan Kapila

Maharashtra and Goa

44

PodaThurpu

Telangana

45

Nari

Rajasthan and Gujarat

46

Dagri

Gujarat

47

Thutho

Nagaland

48

Shweta Kapila

Goa

49

Himachali Pahari

Himachal Pradesh

50

Purnea

Bihar

51

Kathani

Maharashtra

52

Sanchori

Rajasthan

53

Masilum

Meghalaya

म्हशींच्या नोंदणीकृत जाती (एनजीआरए 2023 साठी)

Sr. No

Breed

Home Tract

1

Bhadawari

Uttar Pradesh and Madhya Pradesh

2

Jaffarabadi

Gujarat

3

Marathwadi

Maharashtra

4

Mehsana

Gujarat

5

Murrah

Haryana

6

Nagpuri

Maharashtra

7

Nili Ravi

Punjab

8

Pandharpuri

Maharashtra

9

Surti

Gujarat

10

Toda

Tamilnadu

11

Banni

Gujarat

12

Chilika

Orissa

13

Kalahandi

Odisha

14

Luit (Swamp)

Assam and Manipur

15

Bargur

Tamil Nadu

16

Chhattisgarhi

Chhattisgarh

17

Gojri

Punjab and Himachal Pradesh

18

Dharwadi

Karnataka

19

Manda

Odisha

20

Purnathadi

Maharashtra

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1947737) Visitor Counter : 226


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu