पोलाद मंत्रालय
कच्चे पोलाद उत्पादन आणि विक्री संदर्भात भारतीय पोलाद प्राधिकरणाची (सेल) पहिल्या तिमाहीत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी
Posted On:
11 AUG 2023 9:18AM by PIB Mumbai
भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादितने (सेल ) 30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक पारिणाम जाहीर केले आहेत . आर्थिक फलनिष्पत्तीचे मुख्य ठळक मुद्दे खाली नमूद केले आहेत:
आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीच्या कामगिरीवर (स्वतंत्र ) एक दृष्टीक्षेप:
|
एकक
|
Q1 2022-23
|
Q4 2022-23
|
Q1 2023-24
|
कच्चे पोलाद उत्पादन
|
दशलक्ष टन
|
4.33
|
4.95
|
4.67
|
विक्रीचे प्रमाण
|
दशलक्ष टन
|
3.15
|
4.68
|
3.88
|
परिचालनामधून प्राप्त महसूल
|
₹ कोटी
|
24,029
|
29,131
|
24,358
|
व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वी प्राप्ती (ईबीआयटीडीए )
|
₹ कोटी
|
2,606
|
3,401
|
2,090
|
करापूर्वी नफा (पीबीटी )
|
₹ कोटी
|
1,038
|
1,480
|
202
|
करानंतर नफा (पीएटी )
|
₹ कोटी
|
776
|
1,049
|
150
|
भारतीय पोलाद प्राधिकरणाने उत्पादन आणि विक्रीच्या संदर्भात पहिल्या तिमाहीत आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. कंपनीने गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कच्चे पोलाद उत्पादन आणि विक्री प्रमाणामध्ये अनुक्रमे 8% आणि 23% वाढ नोंदवली आहे.प्रमाणात वाढ झाली असूनही, किंमतीत घट झाल्यामुळे उलाढाल 1% वाढली आहे.
कोकिंग कोळशाच्या किमती स्थिर झाल्यामुळे आणि देशातील शाश्वत वापर वाढीसाठी बाजाराचा दृष्टिकोन सकारात्मक आहे त्यामुळे आगामी काळात हा फरक कमी होऊन सुधारण्याची शक्यता आहे. मध्यम मुदतीत नफा वाढवण्यासाठी कंपनी सहज प्रक्रिया करणारे आणि कार्यक्षमता सुधारणा प्रकल्प देखील हाती घेत आहे.
***
Jaidevi PS/SBC/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1947651)