इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडियन वेब ब्राउझर डेव्हलपमेंट चॅलेंजचा (आयडब्ल्यूबीडीसी) प्रारंभ

Posted On: 09 AUG 2023 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2023

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 9 ऑगस्ट 2023 रोजी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित केलेल्या  कार्यक्रमात इंडियन वेब ब्राउझर डेव्हलपमेंट चॅलेंजचा (आयडब्ल्यूबीडीसी ) प्रारंभ केला. वैज्ञानिक ‘जी’ श्रेणी आणि समूह समन्वयक (इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकास ),सुनीता वर्माइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या  प्रमाणित प्राधिकरणांचे नियंत्रक  अरविंद कुमार आणि सी -डॅक ,बंगळुरूचे कार्यकारी संचालक डॉ. एस .डी . सुदर्शन यांनी संयुक्तपणे वेब ब्राउझर डेव्हलपमेंट चॅलेंजचा प्रारंभ केला. व्यासपीठावर उपस्थित  मान्यवरांच्या हस्ते या चॅलेंज संदर्भातील माहिती  पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

इंडियन  वेब ब्राउझर डेव्हलपमेंट चॅलेंजचे नेतृत्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, सीसीए  आणि सी -डॅक  बंगळुरू  करत आहे.

आयडब्ल्यूबीडीसी ही एक खुली  चॅलेंज स्पर्धा असून ही स्पर्धा  देशाच्या कानाकोपऱ्यातील तंत्रज्ञान उत्साही, नवोन्मेषक आणि विकासकांना स्वतःची   विश्वासार्हता आणि इनबिल्ट सीसीए इंडिया रूट प्रमाणपत्र, अत्याधुनिक कार्यक्षमता आणि वर्धित सुरक्षा आणि डेटा गोपनीयता संरक्षण वैशिष्ट्यांसह स्वदेशी वेब ब्राउझर तयार करण्यासाठी प्रेरित आणि सक्षम करण्याचा प्रयत्न करते.

प्रस्तावित ब्राउझर प्रवेश सुलभता  आणि वापरकर्तास्नेही वैशिष्ट्यांवर  देखील लक्ष केंद्रित करेल, विविध क्षमता असलेल्या व्यक्तींसाठी  समर्थन सुनिश्चित करेल.याशिवाय  ब्राउझर क्रिप्टो टोकन वापरून कागदपत्रांवर डिजिटल स्वाक्षरी करण्याच्या क्षमता संकल्पित करतो . सुरक्षित व्यवहार आणि डिजिटल परस्पर संवादांना चालना देतो.

सी -डॅक ,बंगळुरूचे कार्यकारी संचालक डॉ. एस .डी . सुदर्शन  यांनी संपूर्ण चॅलेंज  स्पर्धेविषयी सविस्तर सांगितले.  कोणीही या चॅलेंजमध्ये भाग घेऊन कल्पना सादर करू शकतो, असे त्यांनी नमूद केले. संपूर्ण चॅलेंज  स्पर्धेमध्ये तीन फेऱ्या असतील, पहिल्या फेरीनंतर म्हणजेच कल्पनाशक्ती फेरीत 18 प्रवेशिका निवडल्या जातील. दुसऱ्या फेरीत 8 स्पर्धकांना अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी निवडले जाईल.शेवटी एक विजेता, प्रथम उपविजेता आणि द्वितीय उपविजेता निवडला जाईल.संपूर्ण चॅलेंजमध्ये तांत्रिक मार्गदर्शन प्रदान केले जाईल. एकूण 3.41 कोटी रुपयांच्या बक्षिसांपैकी, विजेत्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल . विकसित ब्राउझरला पुढील स्तरांवर नेण्यासाठी विजेत्याला आणखी पाठबळ  दिले जाईल.

 S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1947267) Visitor Counter : 213