उपराष्ट्रपती कार्यालय

राज्यसभेत आज 'भारत छोडो' आंदोलनाच्या 81 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांना वाहिली आदरांजली


हा दिवस खासदारांना त्यांच्या योगदानाचे नैतिक आत्मपरीक्षण करण्याचा आणि चिंतन करण्याचा एक सुदिन आहे - उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन

Posted On: 09 AUG 2023 5:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2023

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष, श्री जगदीप धनखर यांनी आज 'भारत छोडो' या ऐतिहासिक महत्वपूर्ण आंदोलनाच्या 81 व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना राज्यसभेत आदरांजली वाहिली. आपले सार्वभौमत्व, अखंडता टिकवून ठेवण्यासाठी आणि भारताच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचे आवाहन त्यांनी सदनाच्या सभागृहात दिलेल्या भाषणात नमूद केले.

संसद सदस्यांनी त्यांच्या योगदानाचे नैतिक आत्मपरीक्षण आणि चिंतन करण्याचा  हा दिन असल्याचे सांगून, त्यांनी सर्व सदस्यांना राष्ट्रसेवेसाठी, लोकांच्या आकांक्षा ओळखण्यावर अधिकाधिक भर देण्याचे आणि राष्ट्राचे  स्थान अभिमानाने सुरक्षित करण्यासाठी अधिक जोमाने पुन्हा समर्पित होण्याचे आवाहन केले.

राज्यसभेच्या अध्यक्षांनी  आपल्या भाषणात स्वातंत्र्यानंतर करण्यात आलेले गरिबी निर्मूलन, साक्षरतेला देण्यात आलेले प्रोत्साहन, भेदभाव निर्मूलन आणि सामाजिक समावेशकता वाढवण्याच्या उद्देशाने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली म्हणून राज्यसभेच्या सर्व सदस्यांनी सभागृहात मौन पाळले.

उपराष्ट्रपतींच्या निवेदनाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे -

 

 

 

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1947156) Visitor Counter : 109