इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भविष्य उज्ज्वल आहे, भारतासाठी  DIR-5  हे भविष्य आहे: केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर

Posted On: 06 AUG 2023 5:02PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज चेन्नई येथे आयआयटी मद्रासने आयोजित केलेल्या डिजिटल इंडिया RISC-V (DIR-5) परिसंवादाला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित केले. राजीव चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणात सरकारच्या DIR-5  संबंधी दृष्टीकोनावर जोर दिला. DIR-5 चे उद्दिष्ट प्रभावी सार्वजनिक-खाजगी भागीदारी आणि आयआयटी मद्रास सारख्या अग्रगण्य शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने RISC-5 साठी एक मजबूत परिसंस्था तयार करणे हे आहे.

गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या DI—5  कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्रगत मायक्रोप्रोसेसर तयार करून भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला चालना देणे हे आहे. उद्योगातील प्रत्येक सहभागीसाठी DIR-5  तंत्रज्ञानाच्या संधी कशा निर्माण करेल आणि भारताची टेकएड उद्दिष्टे साध्य करण्यात DIR-V कशा प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावेल याबाबत मंत्र्यांनी आपले विचार मांडले.

आज, भारताचे भविष्य उज्ज्वल आहे, आणि हे उज्ज्वल भविष्य DIR-V हेच आहे, असे ते म्हणाले. हा उपक्रम भारताचे टेकएड परिभाषित करेल आणि तंत्रज्ञानाच्या अनेक संधी उपलब्ध करून देईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आधीच केली असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. हा उपक्रम आपले अभियंते आणि भारतातील स्टार्टअप्सची सर्जनशीलता आणि नवकल्पनाद्वारे प्रेरित असेल, असे ते म्हणाले. नवोन्मेष, कार्यक्षमता आणि कार्यप्रदर्शन - हे DIR-V कार्यक्रमाचे येत्या वर्षांसाठीचे मूलमंत्र आहेत, असे त्यांनी सांगितले. DIR-V ला भारतीय ISA (इंस्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर) बनवण्यासाठी भारत सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे राजीव चंद्रशेखर म्हणाले.

भारतीय तंत्रज्ञानातील आपली महत्त्वाकांक्षा IoT सह ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रियल स्पेस, गतिशीलता आणि उच्च-कार्यक्षमता संगणनासह कॉम्प्युटिंग या तीन क्षेत्रांमध्ये विभागलेली आहे. या तीनही विभागांमध्ये DIR-V च्या महत्वपूर्ण सहभागाची खात्री करणे हे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

या एकदिवसीय परिसंवादात विविध तंत्रज्ञान नवकल्पनांचे प्रदर्शन करण्यात आले होते. स्टार्टअप्स, विद्यार्थी आणि उद्योगातील शिक्षणतज्ञांनी या परिसंवादात सहभाग घेतला.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1946240) Visitor Counter : 109