आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

‘ब्रिक्स’ समूहातील देशांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक


केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी ब्रिक्स समूहातील देशांच्या  आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीमध्‍ये  केले मार्गदर्शन

भारताच्या जी -20 अध्यक्षपदामुळे ‘ग्लोबल साउथ’चे आरोग्य विषयक प्रश्‍न - चिंता सोडविण्‍यासाठी एक व्यासपीठ मिळाले -  डॉ मनसुख मांडविया

‘ब्रिक्स टीबी रिसर्च नेटवर्क’ तयार करण्‍यासाठी पुढाकार घेण्‍याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार

Posted On: 05 AUG 2023 5:30PM by PIB Mumbai

 

भारताच्या जी - 20 अध्‍यक्षपदाच्या कायर्काळामध्‍ये  ग्लोबल साउथच्या चिंता सोडविण्यासाठी एक विशिष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. याचा फायदा  जी-20 चे याआधी अध्‍यक्ष  असलेल्या  इंडोनेशिया आणि आता भारतानंतर हे पद सांभाळणारा देश  ब्राझील या दोन्ही देशांना होणार आहे. यामुळे  ग्लोबल साउथसमोरील आव्हानांना अधोरेखित केले जात आहे. तसेच जागतिक प्रशासनाच्या सर्वोच्च स्तरावर या समस्यांचे निराकरण करण्याची एक मौल्यवान संधी मिळत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे आयोजित ब्रिक्स समूहातील देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत दूरदृश्‍य प्रणालीव्दारे सहभागी होत ही माहिती दिली.

शाश्वत आरोग्य  साध्‍य करण्‍यासाठी यूएचसी 2023 च्या दिशेने वाटचाल करताना मधले अंतर कमी करणे या संकल्पनेच्या माध्यमातून  युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजच्या कार्यक्रमाला प्राधान्य दिल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेच्या उपक्रमांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रशंसा केली. भारताच्या जी - 20 प्राधान्यक्रमाशी  समकक्ष- संलग्न असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या‍ ब्रिक्सच्‍या उपक्रमातील   आरोग्य आणीबाणी व्यवस्थापन, वैद्यकीय प्रतिकार उपाय योजना  तसेच  आरोग्यसेवा सेवाही  प्रदान केली जाणार आहे, यावर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी भर दिला.  विशेषत: 'डिजिटल हेल्थ इनोव्हेशन्स आणि सोल्यूशन्स’   यामुळे  युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजमध्‍ये सुधारणा होवून या सेवेच्या वितरणाला मदत मिळू शकणार आहे, असे ते म्हणाले.

यावेळी  सर्व केंद्रीय मंत्र्यांनी आण्विक औषधांमध्ये ब्रिक्स सहयोगासाठी रशियाच्या पुढाकाराचे स्वागत केले आणि आण्विक औषधांवर आंतरराष्ट्रीय तज्ञ मंच स्थापन करण्यास पाठिंबा दर्शविला. त्यांनी नमूद केले की "या क्षेत्रातील सहयोगामुळे केवळ ज्ञानाची  देवाणघेवाण करण्याला प्रोत्साहन मिळणार नाही तर ब्रिक्स समूहातील  राष्ट्रांची  तांत्रिक प्रगती देखील वाढेल".

डॉ. मांडविया यांनी ब्रिक्स टीबी रिसर्च नेटवर्कउपक्रमासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. ही मोहीम  सुरू  झाल्यापासून जी प्रगती झाली आहे, त्याची दखल घेतली आणि 2030 पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल, असे मत व्यक्त केले.

डॉ. मनसुख मांडविया यांनी ब्रिक्स राष्ट्रांना बैठकीतील  निर्णयांचे  तातडीने आणि वचनबद्धतेच्या भावनेने अंमलात आणण्याचे आवाहन केले आणि विधायक सहभागाचे आयोजन केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य मंत्रालयाचे आभार मानले. तसेच आगामी ब्रिक्स अध्यक्षपदासाठी रशियाला शुभेच्छा दिल्या.

***

R.Aghor/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1946137) Visitor Counter : 126