भूविज्ञान मंत्रालय
समुद्रतळातील संसाधनांचा अभ्यास करण्यासाठी पाणबुडीतून 6 किमी खोलीवर तीन तज्ञांना पाठवण्याचे समुद्रयान प्रकल्पाचे लक्ष्य : किरेन रिजीजू
खोल सागरी मोहीम म्हणजे महासागरातील संसाधन संधीचा शोध घेणारी मोहीम : रिजीजू
प्रविष्टि तिथि:
03 AUG 2023 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2023
समुद्रतळातील संसाधनांचा अभ्यास आणि जैवविविधतेचे मूल्यांकन करण्यासाठी पाणबुडीतून 6000 मीटर खोलीवर तीन तज्ञांना पाठवणे हे समुद्रयान प्रकल्पाचे लक्ष्य आहे असे केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे. संबंधित पाणबुडींचा वापर संसाधनांच्या शोधासाठी केला जात असल्याने या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार नाही असे त्यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितले.
खोल सागरी मोहिमेमुळे सरकारच्या सागरी अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळते. देशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढवण्याची यात क्षमता आहे. देशाच्या आर्थिक वाढीसाठी उंचावलेले जीवनमान, रोजगार आणि सागरी पर्यावरणीय आरोग्यासाठी सागरी संसाधनांचा शाश्वत वापर करणे हा याचा उद्देश असल्याचे रिजीजू यांनी सभागृहाला सांगितले.
S.Patil/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1945422)
आगंतुक पटल : 220