भूविज्ञान मंत्रालय
हवामान बदलाचा भारतीय उपखंडावर झालेला परिणाम
1950 ते 2015 या कालावधीत दैनंदिन पर्जन्यमानाची तीव्रता प्रतिदिन दीडशे मिलीमीटरपेक्षा अधिक होण्याच्या वारंवारतेत सुमारे 75%नी वाढ
अडीच दशकांमध्ये दक्षिण हिंदी महासागराची समुद्र पातळी दर वर्षी 3.3 मिलिमीटर या वेगाने वाढत आहे
प्रविष्टि तिथि:
02 AUG 2023 6:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2023
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने (एमओईएस) वर्ष 2020 मध्ये ‘भारतीय भूप्रदेशात झालेल्या हवामान बदलाचे मूल्यमापन’ हा अहवाल प्रसिध्द केला आहे. यामध्ये भारतीय उपखंडावर झालेल्या हवामान बदलाच्या परिणामाचे व्यापक मूल्यमापन करण्यात आले आहे. या अहवालातील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
- वर्ष 1901 ते 2018 या कालावधीत भारताचे सरासरी तापमान सुमारे 0.7 अंश सेल्सियसने वाढले आहे.
- वर्ष 1950 ते 2015 हा कालावधीत दैनंदिन पर्जन्यमान अतिप्रमाणात (पर्जन्यमानाची तीव्रता प्रतिदिन दीडशे मिलीमीटरपेक्षा अधिक )होण्याची वारंवारता सुमारे 75%नी वाढली.
- वर्ष 1951 ते 2015 या काळात दुष्काळ पडण्याची वारंवारता आणि दुष्काळाची क्षेत्रीय व्याप्ती लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.
- वर्ष 1993 ते वर्ष 2017 या अडीच दशकांमध्ये दक्षिण हिंदी महासागराची समुद्र पातळी दर वर्षी 3.3 मिलिमीटर या वेगाने वाढत आहे.
- वर्ष 1998 ते 2018 या काळात पावसाळ्यानंतर अरबी समुद्रात भयंकर चक्रीवादळ येण्याचे प्रमाण वाढले आहे.
भारतीय हवामान विभाग (आयएमडी)भारतीय भूप्रदेशातील हवामानावर नियमितपणे लक्ष ठेवून असते आणि हाती आलेल्या निरीक्षणावरून “वार्षिक हवामानविषयक सारांश’ या वार्षिक हवामानाचे प्रकाशन करते. आयएमडी मासिक हवामानविषयक सारांश अहवाल देखील जारी करत असते. वार्षिक हवामानविषयक सारांशामध्ये संदर्भित कालावधीतील तापमान, पाऊस, अतितीव्र हवामानविषयक घडामोडी यांच्याविषयीच्या माहितीचा समावेश असतो.
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1945165)
आगंतुक पटल : 216