पोलाद मंत्रालय
एनएमडीसीने जुलै 2023 पर्यंतच्या कालावधीत नोंदवले विक्रमी उत्पादन
राष्ट्रीय खाण कंपनी 100 दशलक्ष टनी खाण कंपनी बनण्याच्या मार्गावर
Posted On:
02 AUG 2023 4:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2023
पोलाद मंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएमडीसी ) या नवरत्न खाण कंपनीने जुलै 2023 पर्यंतच्या कालावधीत विक्रमी उत्पादन नोंदवले आहे. राष्ट्रीय खाण कंपनीने आर्थिक वर्ष 24 मध्ये आत्तापर्यंत विक्रमी कामगिरी केली असून 100 दशलक्ष टनी खाण कंपनी बनण्याच्या मार्गावर आहे. तसेच सलग दोन आर्थिक वर्षात 40 दशलक्ष टनांच्या ऐतिहासिक उत्पादनाला मागे टाकण्यासाठी सज्ज आहे.
कंपनीने जुलै 2023 पर्यंत कच्च्या पोलादाची 13.15 दशलक्ष टन उत्पादनाची नोंद केली तर 14.18 दशलक्ष टन विक्री केली असून उत्पादन आणि विक्रीमध्ये अनुक्रमे 20% आणि 33.5% ची वार्षिक वाढ नोंदवली आहे. एकट्या जुलैमध्ये, खाण क्षेत्रातील या प्रमुख कंपनीने 2.44 दशलक्ष टन उत्पादन घेतले आणि 3.03 दशलक्ष टन कच्च्या पोलादाची विक्री केली आहे आणि उत्पादन आणि विक्रीतील ही वाढ अनुक्रमे 19% आणि 2.7% आहे.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1945034)
Visitor Counter : 133