विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी भारतातील पहिल्या स्वदेशात विकसित, परवडणाऱ्या, हलक्या, अल्ट्राफास्ट, हाय फील्ड (1.5 टेस्ला), पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर आधारित मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (MRI) स्कॅनरचा नवी दिल्ली येथे केला प्रारंभ

Posted On: 01 AUG 2023 8:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2023

केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज भारतातील पहिल्या स्वदेशात विकसित, परवडणाऱ्या, हलक्या, अल्ट्राफास्ट, हाय फील्ड (1.5 टेस्ला), पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर आधारित मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (MRI) स्कॅनरचा नवी दिल्ली येथे प्रारंभ केला.

स्वदेशी एमआरआय स्कॅनर उपलब्ध करून दिल्याने, एमआरआय स्कॅनिंगची किंमत सामान्य माणसासाठी लक्षणीयरीत्या परवडणारी होईल अशी अपेक्षा आहे. तसेच सध्या उच्च दरात उपलब्ध असणारी एमआरआय स्कॅनिंग सुविधा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल असे डॉ जितेंद्र सिंह यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. याशिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारातून एमआरआय स्कॅनरच्या खरेदीतील भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुहेरी उद्दिष्ट तसेच आत्मनिर्भरतेचे एकूण उद्दिष्ट पूर्ण होऊन भारतातील निदान उपकरणे आणि उपचारात्मक उत्पादने अत्याधुनिक बनतील असेही ते म्हणाले. येत्या काही वर्षात मेक इन इंडिया-मेड फॉर द वर्ल्ड असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय बायोफार्मा मिशन अंतर्गत, व्होक्सलग्रिड्स इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडने देशाची गरज पूर्ण करण्यासाठी कॉम्पॅक्ट, हलके, अत्याधुनिक एमआरआय स्कॅनर विकसित केला आहे, अशी माहिती डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली.

जागतिक दर्जाचे एमआरआय स्कॅनर विकसित करण्यासाठी खर्च करण्यात आलेल्या 17 कोटी रुपयांपैकी 12 कोटी रुपये जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद (BIRAC) द्वारे प्रदान करण्यात आल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले.

 

S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1944833) Visitor Counter : 109