राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय परराष्ट्र सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

प्रविष्टि तिथि: 01 AUG 2023 12:30PM by PIB Mumbai

भारतीय परराष्ट्र सेवेतील (2022 ची तुकडी) परिविक्षाधीन  अधिकाऱ्यांनी आज (1 ऑगस्ट, 2023) राष्ट्रपती भवनात  राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी यापेक्षा अधिक उत्तम वेळ असू शकत नाही असे या अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या.जागतिक प्रगतीचा प्रेरणास्रोत म्हणून तसेच जागतिक प्रशासनातील एक बुलंद आवाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताची भूमिका आणि प्रभाव झपाट्याने विस्तारत चालला आहे.आज, शाश्वत विकास असो, हवामान बदल असो, सायबर सुरक्षा असो, आपत्तींना सामोरे जाणे असो किंवा अतिरेकी आणि दहशतवादविरोधी लढा असो,जटिल जागतिक आव्हानांवरील उपाययोजना शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय भारताकडे आश्वासक नजरेने पाहत आहे.यामुळे आपल्यासारख्या तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी नवीन आव्हानांसह अभूतपूर्व संधी उपलब्ध होत आहेत, असेही त्या पुढे म्हणाल्या.

तरुण अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची तयारी करत असताना, हे लक्षात ठेवले पाहिजे की परदेशातील त्यांच्या सर्व प्रयत्नांचे आणि उपक्रमांचे अंतिम उद्दिष्ट आपल्या स्वत:च्या देशाची प्रगती वाढ आणि विकासाला चालना देणे हे असले पाहिजे.

 

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -


*****

Jaydev iPS/Sampada/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1944591) आगंतुक पटल : 164
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Tamil , Kannada