माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दिल्ली पुस्तक मेळा 2023 मध्ये आपला साहित्यिक खजिना प्रदर्शित करण्यासाठी प्रकाशन विभाग सज्ज


'राष्ट्र उभारणीत पुस्तकांची भूमिका' या संकल्पनेसह प्रगती मैदानावर 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2023 दरम्यान  दिल्ली पुस्तक मेळाव्याचे आयोजन

प्रकाशन विभाग आपल्या पुस्तकांचा आणि जर्नल्सचा विस्तृत संग्रह यात प्रदर्शित करेल तसेच निवडक पुस्तकांवर  भरघोस सवलत देईल

Posted On: 28 JUL 2023 6:34PM by PIB Mumbai

 

नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2023 दरम्यान आयोजित  दिल्ली पुस्तक मेळा या  बहुप्रतिक्षित पुस्तक मेळाव्यात  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा प्रकाशन विभाग सहभागी होणार आहे.  हा 27 वा मेळावा इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन या संस्थेने भारतीय प्रकाशक महासंघाच्या सहकार्याने  आयोजित केला आहे.  प्रगती मैदानाच्या स्टॉल क्रमांक 12, हॉल क्रमांक 11 येथे  प्रकाशन विभाग पुस्तके आणि जर्नल्सचा विस्तृत संग्रह प्रदर्शित करेल आणि निवडक पुस्तकांवर  भरघोस सवलत देखील देणार आहे.

'राष्ट्र उभारणीत पुस्तकांची भूमिका' ही या पुस्तक मेळ्याची संकल्पना असून  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशन विभाग भारतीय स्वातंत्र्यलढा  आणि स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास सांगणाऱ्या  पुस्तकांचा समृद्ध संग्रह या मेळाव्यात प्रदर्शित करणार आहे. ही पुस्तके या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या पुस्तक प्रेमींची मनं नक्कीच आकर्षित करतील. प्रदर्शनामध्ये गांधीवादी साहित्य, इतिहास आणि स्वातंत्र्य लढा, व्यक्तिमत्त्वे आणि चरित्रे, जमीन आणि लोक, कला आणि संस्कृती, चित्रपट  आणि बालसाहित्य यासारख्या विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे.  राष्ट्रपती भवनावर विशेष  पुस्तके तसेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवडक भाषणांचा संग्रह देखील प्रकाशन विभागाद्वारे मेळाव्यात उपलब्ध करून दिला जाणार असून  प्रकाशन विभागाने ते खास प्रकाशित केले आहे.

पुस्तकांव्यतिरिक्त , प्रकाशन विभागाची योजना, कुरुक्षेत्र, आजकल आणि बालभारती यांसारखी  लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर प्रसारित नियतकालिकेही स्टॉलवर उपलब्ध आहेत. विभागाद्वारे प्रकाशित नियतकालिके आणि एम्प्लॉयमेंट न्यूज/रोजगार समाचार  वार्षिक वर्गणी भरून  वाचकप्रेमी खरेदी करू शकतात.

विद्यार्थ्यांना, विशेषत: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांना  प्रकाशन विभागाच्या स्टॉलवर योग्य पुस्तके मिळतील जी त्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत करतील. विभागाचा बालसाहित्याचा समृद्ध संग्रहदेखील मुले आणि पालकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. एखाद्याला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल अधिक जाणून घेण्यात, देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाबाबत , राष्ट्र उभारणीसाठी आपले जीवन समर्पित केलेल्या  राष्ट्रीय नेत्यांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल  किंवा  चांगले पुस्तक शोधणाऱ्या प्रत्येकासाठी प्रकाशन विभागाकडे  काही ना काही आहे.

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1943831) Visitor Counter : 160


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi