रसायन आणि खते मंत्रालय

जनऔषधी योजनेत नवीन उत्पादने आणि न्यूट्रास्युटिकल्सचा समावेश


उत्पादनांच्या वाढीव यादीमध्ये 1800 औषधे आणि 285 शस्त्रक्रिया उपकरणांचा समावेश

Posted On: 28 JUL 2023 2:55PM by PIB Mumbai

 

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेची (PMBJP) अंमलबजावणी करणाऱ्या भारतीय औषधे आणि शस्त्रक्रिया उपकरणे कार्यालयाने (PMBI), आपल्या यादीत डॅपाग्लायफ्लोझीन 10 मिलीग्राम, मेटफार्मिन हाइड्रोक्लोराइड ( सावकाश पाझरणारे) 1000 मिलीग्राम ही मधुमेहाच्या उपचारासाठी वापरली जाणारी औषधे तसेच जन औषधी प्रोटीन (उच्च प्रथिने) पावडर, महिलांसाठी जन औषधी प्रोटीन पावडर (व्हे प्रोटीन पावडर) यासारख्या नव्या उत्पादनांचा समावेश केला आहे.

सरकारने 31 डिसेंबर 2023 पर्यंत देशभरात 10,000 जन औषधी केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात 30 जून 2023 पर्यंत एकूण 9512 जनऔषधी केंद्रे उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP) च्या उत्पादन यादीमध्ये 1800 औषधे, 285 शस्त्रक्रिया उपकरणे आणि इतर उपभोग्य वस्तूंचा समावेश आहे. ही उत्पादने जन औषधी केंद्रात बाजाराच्या तुलनेत 50 % - 90 % सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.

Sl.  No.

Drug Code

Medicine Name

Pack Size

Jan Aushadhi MRP in Rs.

1

2099

Metformin Hydrochloride (Extended release) 1000mg and Dapagliflozin 10mg Tablets

10's

55.00

2

2100

Metformin Hydrochloride (Extended release) 500mg and Dapagliflozin 10mg Tablets

10's

51.00

3

2240

Diabetes Care Protein Powder

400g Jar

400.00

4

2241

Renal care protein powder (Low Protein)

400g Jar

400.00

5

2242

Renal care protein powder for dialysis patients (High Protein)

400g Jar

500.00

6

2246

Janaushadhi Women Protein (Chocolate) 250g

250g Jar

230.00

7

2247

Janaushadhi Women Protein (Vanilla) 250 gm

250g Jar

230.00

8

2248

Janaushadhi Poshan with Cocoa 30gm

30g Sachet

10.00

 

मधुमेह आणि महिलांच्या आरोग्याची वाढती समस्या लक्षात घेऊन, जनऔषधी योजनेने आपल्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या यादीमध्ये खाली नमूद केलेल्या उत्पादनांचा प्रारंभ करून यादीत भर घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही उत्पादने सामान्य जनतेसाठी आधीपासूनच देशभरातील निवडक जन औषधी केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत.

***

S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1943702) Visitor Counter : 127


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu