संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सैनिकी शाळांमधील विद्यार्थिनी

Posted On: 24 JUL 2023 5:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2023

 

देशात पूर्वीच्या अभ्यासक्रमा अंतर्गत स्थापित सैनिकी शाळांमध्ये शिकणाऱ्या एकूण विद्यार्थिनींची संख्या 18.07.2023 रोजी 1,299 आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा तपशील खाली दिला आहेः

  • सैनिकी विद्यालय, चंद्रपूर - विद्यार्थिनी संख्या - 34

देशात सह-शिक्षण पद्धतीनुसार उघडलेल्या सैनिकी शाळांमध्ये शिकणाऱ्या एकूण विद्यार्थिनींची संख्या 18.07.2023 रोजी 303 आहे. महाराष्ट्रातील तपशील खाली दिले आहेत:

  • एस. के. इंटरनॅशनल स्कूल, सांगली - 24 (विद्यार्थिनी संख्या)
  • पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल, अहमदनगर - 0

पूर्वीच्या अभ्यासक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या देशातील सर्व 33 सैनिकी शाळा सह-शैक्षणिक पद्धतीच्या आहेत. बिगरसरकारी संस्था /खाजगी/ राज्य सरकारी शाळांसोबत भागीदारी पद्धतीने सुरू करण्यात आलेल्या नवीन सैनिक शाळांच्या बाबतीत केवळ मुलांसाठी /मुलींसाठी/ सह-शिक्षण आधारावर स्थापन केलेल्या शाळा अशी कोणतीही अट नाही.

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज राज्यसभेत डॉ अनिल सुखदेवराव बोंडे यांना लेखी उत्तर देताना ही माहिती दिली.

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1942112)