आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष मंत्रालयाच्या प्रयत्नांनी भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील चर्चासत्रांमध्ये पारंपरिक औषध प्रणाली अग्रस्थानी - जी20 शेर्पा अमिताभ कांत 

Posted On: 23 JUL 2023 5:38PM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे आरोग्यासंदर्भातील जी 20 चर्चासत्रांमध्ये  पारंपरिक औषध प्रणाली अग्रस्थानी  राहिली आणि  आरोग्यविषयक आव्हानांवर मात करण्यासाठी  पारंपारिक औषधांची संभाव्य भूमिका जी 20 समूहाने मान्य केली आहे, असे स्पष्ट आणि ठाम मत संबंधितांनी नवी दिल्ली येथे आयोजित जी 20 प्रतिबद्धता गटांशी झालेल्या महत्त्वपूर्ण संवादात्मक बैठकीत  मांडले.

या संवादात्मक  बैठकीला जी20 शेर्पा  अमिताभ कांतआयुष्य मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा , केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे   अतिरिक्त सचिव  लव अग्रवाल, परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभय ठाकूर,   विविध संलग्न गटांचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर सहभागी झाले.

आपल्या भाषणात अमिताभ कांत म्हणाले की , सर्व प्रतिबद्धता आणि कार्यगटांसह सक्रियपणे सहकार्य करण्यात आघाडीवर असल्याबद्दल मी आयुष मंत्रालयाचे खूप प्रशंसा करतो.

शतकानुशतके भारतातील आरोग्याचे अविभाज्य स्त्रोत असलेली  "पारंपरिक औषधे " खूप महत्वाची आहेत  त्यामुळे आपण सर्वांगीण आरोग्य आणि निरामयतेसाठी  आयुष उपचार पद्धतींचे महत्त्व विस्तारण्याची  गरज अमिताभ कांत यांनी  व्यक्त केली.  जागतिक आरोग्य संघटनेने भारतात एक समर्पित जागतिक आरोग्य संघटना पारंपरिक औषधांचे जागतिक केंद्र  (डब्ल्यूएचओ जीसीटीएम ) आणले आहे आणि हे केंद्र पारंपारिक औषधांच्या सामर्थ्याचा  उपयोग करेल, यावर त्यांनी भर दिला.

आरोग्यविषयक सर्व आव्हानांवर  मात  करण्याच्या दृष्टीने जग एकात्मिक आरोग्य किंवा समग्र आरोग्य या संकल्पनेबद्दल चर्चा करत  आहे, आम्ही सहकार्याने   काम करत आहोत, जी 20 देशांमध्ये समन्वय साधत आहोत आणि आरोग्य क्षेत्रात पारंपरिक औषधांच्या भूमिकेच्या स्वीकृतीबाबत सर्वांचे स्पष्ट मत आहे.असे आपल्या भाषणात  लव अग्रवाल यांनी सांगितले.

भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली आयुष मंत्रालयाचे योगदान मांडणे हा मुख्य उद्देश होता आणि तो यशस्वीरित्या साध्य झाला. आरोग्य कार्यगटाच्या सर्व बैठकांमध्ये पारंपरिक औषधांचे योगदान प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आणि मंत्रालय या प्रयत्नांची प्रशंसा करते, असे वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितले.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1941949) Visitor Counter : 129