नागरी उड्डाण मंत्रालय
खजुराहो, मध्यप्रदेश येथे 25 जुलै रोजी 5वी हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट शिखर परिषदेचे आयोजन
Posted On:
23 JUL 2023 10:13AM by PIB Mumbai
- शिखर परिषदेचे उद्घाटन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते होणार आहे.
- उडान योजनेची व्याप्ती वाढवून दुर्गम आणि डोंगराळ प्रदेशात या सेवेचा विस्तार करणे हे शिखर परिषदेच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे.
मध्य प्रदेश सरकार, नागरी विमानवाहतूक मंत्रालय, पवन हंस लिमिटेड आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) यांनी संयुक्तपणे 5व्या हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट शिखर परिषदेचे आयोजन मध्य प्रदेशात खजुराहो येथे 25 जुलै 2023 रोजी केले आहे.
"रिचिंग द लास्ट माईल: हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्टद्वारे स्थानिक संपर्क" अशी या कार्यक्रमाची संकल्पना आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते याचे उद्घाटन होईल. उद्घाटन सत्रानंतर तांत्रिक सत्र होईल.
शिखर परिषदेची मुख्य उद्दिष्टे
- विमानउद्योगातील संबधितांना आणि धोरणकर्त्यांना भारतीय हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट उद्योगाच्या विस्ताराबद्दल चर्चा करण्यासाठी एक समान मंच उपलब्ध करुन देणे.
- दुर्गम आणि डोंगराळ भागात उडान योजनेचा विस्तार करणे आणि देशाच्या ग्रामीण ते शहरी कनेक्टिव्हिटीत वाढ करणे.
- विद्यमान आणि संभाव्य प्रमुख पर्यटनस्थळी हेलिकॉप्टर आणि लहान विमानांमार्फत कनेक्टिव्हिटी वाढवून विनाव्यत्यय हवाई सेवा देणे .
5 व्या हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट शिखर परिषदेचा टीझर
https://twitter.com/MoCA_GoI/status/1682617297276370944?s=20
4 थ्या हेलि-इंडिया शिखर परिषदेची माहिती
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1866510
***
MaheshI/VijayaS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1941872)
Visitor Counter : 164