संरक्षण मंत्रालय
G20 थिंक
भारतीय नौदल प्रश्नमंजुषा - क्षितिजा पलीकडे प्रवास
Posted On:
21 JUL 2023 12:38PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाने, दुसऱ्या भारतीय नौदल प्रश्नमंजुषा "G20 थिंक (THINQ)" च्या आयोजनाची सुरुवात केली आहे. ही स्पर्धा जी G20 सचिवालय, भारतीय नौदल आणि नेव्ही वेलफेअर अँड वेलनेस असोसिएशन यांनी संयुक्तपणे आयोजित केली आहे. इयत्ता नववी ते बारावी आणि त्यांच्या समतुल्य वर्गात शिकणाऱ्या शालेय मुलांसाठी ही स्पर्धा एक आगळा वेगळा आणि समृद्ध करणारा अनुभव देईल.
गेल्या वर्षीच्या थिंक-22 स्पर्धेत देशभरातील 6425 शाळा सहभागी झाल्या होत्या. हा अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेऊन , यंदा ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आली आहे.
G20 थिंक स्पर्धेचे दोन टप्पे आहेत: राष्ट्रीय पातळीवरील फेरी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील फेरी. राष्ट्रीय फेरीत देशाच्या सर्व भागातून 10,000 पेक्षा जास्त शाळांचा सहभाग अपेक्षित आहे. ऑनलाइन माध्यमातील अनेक फेऱ्यांनंतर, 16 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी सोळा शाळांची निवड केली जाईल. त्यानंतर, 18 नोव्हेंबर 2023 रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे होणार्या अंतिम फेरीत अव्वल आठ संघ राष्ट्रीय जेतेपदासाठी लढतील. उपांत्य फेरीतील सर्व सोळा संघांना नौदल डॉकयार्डला भेट देण्याची आणि जहाजे आणि पाणबुड्यांवरील नौदल कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची संधीही मिळेल.
आंतरराष्ट्रीय फेरीत G20 (+09) देशांमधील निमंत्रित देशांचा सहभाग असेल. स्पर्धेसाठी प्रत्येक देश इयत्ता 9वी ते 12वी आणि त्यांच्या समकक्ष दोन विद्यार्थ्यांचा संघ नामांकित करेल. प्रश्नमंजुषा स्पर्धा इंग्रजी भाषेत असेल, आणि ती आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत असेल. स्पर्धेच्या राष्ट्रीय पातळीवरील फेरीसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया सध्या खुली असून, एक हजारापेक्षा जास्त शाळांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे. अधिक तपशील आणि नोंदणीसाठी, G20 थिंक स्पर्धेच्या पुढील अधिकृत वेबसाइटला भेट द्या:‘theindiannavyquiz.in’.
त्वरा करा! 31 जुलै 2023 रोजी नोंदणी बंद होईल.
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1941378)
Visitor Counter : 181