निती आयोग
इंडिया क्लायमेट एनर्जी डॅशबोर्ड (आयसीईडी) आता लाईव्ह उपलब्ध
हवामान कृती प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी आयसीईडीचा इन-बिल्ट अॅनालिटिक्सच्या मदतीने जवळपास वास्तविक वेळेत डेटा पुरवठा
500 मापदंडांच्या एकात्मिक डेटाबेससह वापरण्यास अनुकूल प्लॅटफॉर्म
Posted On:
20 JUL 2023 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2023
नीती आयोगाने आज इंडिया क्लायमेट एनर्जी डॅशबोर्ड 3.0 जारी केले. सरकारद्वारे प्रकाशित स्त्रोतांवर आधारित हा देशातील वन-स्टॉप प्लॅटफॉर्म आहे जो ऊर्जा क्षेत्र, हवामान आणि संबंधित आर्थिक डेटाबेस विषयी जवळपास वास्तविक वेळेत डेटा पुरवतो.
ICED 3.0 हा वापरण्यास अनुकूल प्लॅटफॉर्म असून वापरकर्त्यांना विश्लेषणात्मक इंजिनचा वापर करून डेटापर्यंत सहजपणे पोहचण्यास आणि विश्लेषण करण्यास सक्षम बनवते. मुख्य आव्हाने ओळखताना ऊर्जा आणि हवामान क्षेत्रांबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करेल. डेटाच्या उपलब्ध मापदंडांमधून हे पोर्टल अधिक माहिती समजून घेईल. परिणामी स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने भारताच्या संक्रमण प्रवासाच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त आहे.
हा डॅशबोर्ड 500 पेक्षा जास्त मापदंड, 2000 हून अधिक इन्फोग्राफिक्स आणि दृश्य स्वरूपात डेटा सादर करण्यासाठी अनेक कल्पना उपलब्ध करून वापरकर्त्यांना भारताच्या ऊर्जा क्षेत्राची समग्र माहिती मिळवण्यास उपयुक्त आहे.
* * *
R.Aghor/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1941223)
Visitor Counter : 147