सांस्कृतिक मंत्रालय

ग्रंथालयांच्या विकासाला आणि डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या अनोख्या "ग्रंथालय महोत्सव 2023" चे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार उद्घाटन


अर्जुन राम मेघवाल यांनी "ग्रंथालय महोत्सव" 2023 चे वेळापत्रक केले जारी

Posted On: 19 JUL 2023 10:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जुलै 2023

नवी दिल्लीतील प्रगती मैदानामधील हॉल क्रमांक 5 येथे  5 ते 6 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित  दोन दिवसीय ‘ग्रंथालय महोत्सव 2023’ चे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कायदा आणि न्याय मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि सांस्कृतिक व संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज नवी दिल्ली येथे “ग्रंथालय  महोत्सव” च्या वेळापत्रकाचे अनावरण केले. सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहसचिव मुग्धा सिन्हा यावेळी उपस्थित होते.

  

उपराष्ट्रपती जगदीप धनखड या कार्यक्रमाच्या सांगता  समारंभाला उपस्थित राहतील. भारतातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन यावर संवाद सुरू करण्यासाठी या महोत्सवात जगभरातील प्रतिष्ठित ग्रंथालयांची ओळख करून दिली जाणार आहे.

पत्रकारांना संबोधित करताना अर्जुन राम मेघवाल म्हणाले, "ग्रंथालय महोत्सव 2023 हा ज्ञान आणि कल्पनेचा उत्सव आहे. ग्रंथालये हस्तलिखितांचे जतन करतात तसेच इतिहास आणि अमर्याद भविष्यातील दरी सांधतात.

  

आपल्या डिजिटल लायब्ररी उपक्रमाने अडथळे दूर केले आहेत, सर्व नागरिकांना ज्ञान मिळवण्यास सक्षम बनवले आहे. चला उत्साहाने हा उत्सव साजरा करूया, ग्रंथालयांची परिवर्तनात्मक शक्ती आणि एक राष्ट्र , एक  डिजिटल लायब्ररी देणार्‍या अमर्याद संधींचा अंगीकार करूया. ग्रंथालयांच्या विकासाला आमचे प्राधान्य असेल कारण ग्रंथालये हा विकासाप्रति मानवकेंद्री दृष्टिकोनाचा अत्यावश्यक भाग आहे असे ते पुढे म्हणाले. प्रत्यक्ष स्वरूपातील ग्रंथालयांनी आपल्या देशात अभिमानाचे स्थान मिळवले आहे आणि आम्हाला लोकांमध्ये वाचन संस्कृती पुनरुज्जीवित करायची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1940869) Visitor Counter : 150


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu