संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अर्जेंटिनाचे संरक्षण मंत्री जॉर्ज एनरिक तैना यांनी संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याबाबत नवी दिल्ली येथे केली चर्चा
संरक्षण विषयक औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर भर
प्रविष्टि तिथि:
18 JUL 2023 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2023
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 18 जुलै 2023 रोजी नवी दिल्ली येथे अर्जेंटिनाचे संरक्षण मंत्री जॉर्ज एनरिक तैना यांच्याशी चर्चा केली. दोन्ही मंत्र्यांनी संरक्षण विषयक औद्योगिक भागीदारी वाढवण्याच्या उपायांसह विद्यमान संरक्षण सहकार्य उपक्रमांवर चर्चा केली.
तत्पूर्वी, अर्जेंटिनाच्या संरक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली आणि शहीद वीरांना पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. संरक्षण मंत्र्यांशी झालेल्या चर्चेपूर्वी पाहुण्यांना तिन्ही दलाच्या जवानांनी मानवंदना दिली.
जॉर्ज एनरिक तैना यांचे 17 जुलै 2023 रोजी चार दिवसांच्या भारत भेटीवर नवी दिल्ली येथे आगमन झाले. त्यांच्यासोबत अर्जेंटिनाच्या संरक्षण मंत्रालयाचे आंतरराष्ट्रीय व्यवहार सचिव फ्रान्सिस्को कॅफिरो हे ही आहेत.
अर्जेंटिनाच्या संरक्षण मंत्र्यांनी ब्रह्मोस एरोस्पेसला भेट दिली आणि ते दिल्लीतील आघाडीच्या मुत्सद्यांशी संवादही साधणार आहेत. ते बेंगळुरूला देखील जातील आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL) प्रकल्पाला भेट देतील आणि इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX) द्वारे आयोजित कार्यक्रमात संरक्षण स्टार्ट-अप्सशी स्वतंत्रपणे संवाद साधतील.
भारत-अर्जेंटिना संबंध 2019 मध्ये धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर उंचावले गेले. संरक्षण सहकार्यावर एक सामंजस्य करार देखील 2019 पासून अंमलात आला आहे. उभय देश प्रतिबद्धता अधिक दृढ करण्यासाठी सक्रीय आहेत. भारत आणि अर्जेंटिना संरक्षण गुंतवणुकीला त्यांच्या धोरणात्मक भागीदारीचा एक महत्त्वाचा पैलू बनवण्यासाठी एकत्र काम करत आहेत.
S.Kane/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1940542)
आगंतुक पटल : 189