नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोर्ट ब्लेयर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्‌घाटन

Posted On: 18 JUL 2023 4:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जुलै 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पोर्ट ब्लेयर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी, केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम.सिंदिया, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल विजय कुमार सिंग (निवृत्त), अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल डमिरल डी.के.जोशी तसेच केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

थोर स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांना आदरांजली म्हणून केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम.सिंदिया यांनी केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल विजय कुमार सिंग (निवृत्त) आणि इतर मान्यवरांसह विमानतळाच्या अंतर्गत भागात उभारलेल्या विनायक दामोदर सावरकर (वीर सावरकर) यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधून केलेल्या भाषणात केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम.सिंदिया म्हणाले, अंदमान आणि निकोबार ही बेटे आपल्या देशातील सर्वात सुंदर रत्नांपैकी एक आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे ते साक्षीदार आहेत. या बेटांवर आढळणाऱ्या वनस्पती आणि प्राणी जगताच्या वैविध्याचे प्रतिनिधित्व वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ करते. ऑईस्टर किंवा शिंपल्याच्या आकारात उभारलेल्या या विमानतळ इमारतीमध्ये दिवसा उजेडासाठी कोणत्याही बाह्य स्त्रोताची गरज भासत नाही. शाश्वततेच्या संदर्भात विचार केला तर या विमानतळामध्ये दुहेरी इन्सुलेशन यंत्रणा, एलईडी दिव्यांची प्रकाशयोजना, पर्जन्यजल संकलन तसेच सौर उर्जेवर चालणारे पाण्याचे संयंत्र अशा सुविधा अंतर्भूत केलेल्या आहेत.

ते पुढे म्हणाले, या विमानतळाखेरीज, भारत सरकार दीडशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह शिबपूर,कार निकोबार आणि कँपबेल अशा इतर तीन ठिकाणी विमानतळे तसेच शहीद द्वीप, स्वराज द्वीप आणि पोर्ट ब्लेयर मध्ये  4 ऍरोड्रोम  उभारणार आहे.

  

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1940491) Visitor Counter : 166