आदिवासी विकास मंत्रालय

आदिवासी विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेकडून(NESTS) शिक्षक आणि बिगर-शिक्षक कर्मचाऱ्यांची 4062 पदे भरण्यासाठी ईएमआरएस स्टाफ सिलेक्शन परीक्षा(ESSE)-2023 साठी अधिसूचना जारी

Posted On: 14 JUL 2023 2:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जुलै 2023

 

आदिवासी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शिक्षण संस्था(NESTS) ही आदिवासी मंत्रालयांतर्गत असलेली एक स्वायत्त संस्था असून शिक्षक आणि बिगर-शिक्षक कर्मचाऱ्यांची 4062 पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. नेस्ट्स ने अलीकडेच 4062 पदे भरण्यासाठी ईएमआरएस स्टाफ सिलेक्शन परीक्षा(ESSE)-2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. यामुळे ‘ईएमआरएस’ मध्ये दर्जेदार मनुष्यबळ नियुक्त करून ‘ईएमआरएस’ च्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा होईल.

यासाठी 30-6-2023 पासून आवेदनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सीबीएसईच्या समन्वयाने नेस्ट्स ESSE-2023 या परीक्षेचे ओएमआर आधारित(पेन-पेपर) प्रकाराने खालील शिक्षक आणि बिगर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आयोजन करत आहे. 

 

पदाचे नाव

संख्या

प्राचार्य

303

पीजीटी

2266

लेखापाल

361

कनिष्ठ सहायक सचिव  (JSA)

759

लॅब अटेंडंट

373

एकूण

4062

 

प्रत्येक पदासाठी ऑनलाईन अर्जाची सविस्तर प्रक्रिया, पात्रतेचे निकष आणि अभ्यासक्रमासह इतर सर्व तपशील  emrs.tribal.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.   

राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील  ‘ईएमआरएस’ मधील रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी हे पोर्टल 30.06.2023 ते 31.07.2023 या दरम्यान खुले आहे.

50% किंवा त्यापेक्षा जास्त किंवा 20,000 किंवा त्यापेक्षा जास्त आदिवासी असलेल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आदिवासी समुदायाच्या लोकांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी मंत्रालयाचा ईएमआरएस हा एक अग्रणी उपक्रम आहे.Jaydevi PS/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 (Release ID: 1939439) Visitor Counter : 186