आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पारंपरिक औषध प्रणाली संदर्भात भारताने 20 जुलै 2023 ला आसियान देशांच्या परिषदेचे केले आयोजन


पारंपरिक औषध प्रणालींमध्ये "ॲक्ट ईस्ट पॉलिसी" च्या विस्तारासाठी आयुषमध्ये अभूतपूर्व क्षमता : केंद्रीय आयुष मंत्री

Posted On: 13 JUL 2023 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जुलै 2023

भारताचे परराष्ट्र मंत्रालय, आसियान मधील भारतीय दूतावास आणि आसियान सचिवालयाच्या सहकार्याने आयुष मंत्रालयाने 20 जुलै 2023 रोजी आसियान देशांसाठी, नवी दिल्लीत  पारंपारिक औषधांवरील परिषद आयोजित केली आहे.

भारत आणि आसियान देशांमधील व्यासपीठ बळकट करण्याच्या दृष्टीने पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात या देशांमधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी आणि भविष्यातील सहकार्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार करणे हे या पारंपरिक औषधांवरील परिषदेचे उद्दिष्ट आहे.

"भारत आणि आसियान मधील बहुआयामी संबंध हे समान  भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांच्या मजबूत पायावर उभे असून हे संबंध दोन हजार वर्षांहून  अधिक जुने आहेत." असे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर  ते माध्यमांना संबोधित करत होते. 

"म्यानमार येथे  नोव्हेंबर 2014 मध्ये 12 व्या आसियान भारत शिखर परिषदेमध्ये  भारताचे पंतप्रधान   नरेंद्र मोदी यांनी ‘अ‍ॅक्ट ईस्ट पॉलिसी’ घोषित केली, यामुळे  धोरणात्मक सहकार्याला  एक नवी  गती मिळाली. जवळपास दशकभरानंतर पारंपरिक औषधांवरील भारत आसियान परिषद आयोजित केली जात आहे, हे भारताचे आसियानसोबतचे सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे., असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत आयुष विभागाचे  स्वतंत्र आयुष मंत्रालयात रूपांतर केल्यानंतर  2014 सालापासून गेल्या 9 वर्षांत आयुष क्षेत्राची अनेक पटीने वाढ झाली आहे, असे सोनोवाल यांनी आयुष मंत्रालयाच्या कामगिरीबद्दल तपशील सादर करताना सांगितले.  मधुमेह, कर्करोग, मानसिक आरोग्य यांसारख्या विविध असंसर्गजन्य रोग तसेच कोविड सारख्या संसर्गजन्य रोगांच्या उपचार आणि प्रतिबंधाच्या दृष्टीने, आयुष प्रणालीवर उच्च दर्जाचे संशोधन करण्यासाठी सद्यस्थितीत आयुष  मंत्रालय ब्रिटन, अमेरिका , जपान, ब्राझील, जर्मनी या देशांमधील  अनेक उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय संस्था तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग , जैवतंत्रज्ञान विभाग आयआयटी इत्यादी राष्ट्रीय संस्थांशी संलग्न आहे. आसियान परिषद आयुष मंत्रालयाने राबवलेल्या विविध प्रकल्पांचे संशोधन फलित  सामायिक  करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. त्याचप्रमाणे आसियान देशही त्यांचे अनुभव सांगतील., असे सोनोवाल यांनी सांगितलॆ.

"पारंपरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी आसियान सदस्य देशांच्या  नियामक चौकटीमधील  अलीकडील घडामोडी सामायिक करण्यासाठी देखील ही परिषद एक व्यासपीठ  प्रदान करेल.", असे सोनोवाल यांनी परिषदेची उद्दिष्टे अधोरेखित करताना  सांगितले.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे होणाऱ्या या एक दिवसीय परिषदेत एकूण 75 सहभागी होणार असून 8 आसियान देशांचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि 2 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आभासी पद्धतीने विचारमंथन करतील आणि पारंपरिक औषधांसंदर्भात  त्यांचे विचार मांडणार आहेत.  

 

 

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1939200) Visitor Counter : 172