आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

सशस्त्र दलांतील कर्मचाऱ्यांमध्ये भरड धान्यांचा वापर तसेच खाण्याच्या आरोग्यपूर्ण सवयी यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित तसेच पोषक अन्न मिळेल याची सुनिश्चिती करण्यासाठी संरक्षण मंत्रालय आणि एफएसएसएआय यांच्यात सामंजस्य करार


केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांच्या हस्ते ‘हेल्दी रेसिपीज फॉर डिफेन्स’ या पुस्तकाचे अनावरण

Posted On: 13 JUL 2023 3:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जुलै 2023

सशस्त्र दलांतील कर्मचाऱ्यांमध्ये भरड धान्यांचा वापर तसेच खाण्याच्या आरोग्यपूर्ण सवयी यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित तसेच पोषक अन्न उपलब्ध होईल याची सुनिश्चिती करण्यासाठी एमओडी आणि एफएसएसएआय यांच्यातील सामंजस्य करारावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री (एमओएचएफडब्ल्यू) डॉ.मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत आज, 13 जुलै 2023 रोजी नवी दिल्ली येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी श्रीअन्न (भरड धान्ये)सेवनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या धान्यांचे आरोग्याला होणारे लाभ समजावून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘हेल्दी रेसिपीज फॉर डिफेन्स’ नामक पुस्तकाचे अनावरण देखील केले.

केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे पुरवठा आणि वाहतूक विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल मोहिंदर सिंग यांनी तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणातर्फे एफएसएसएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.कमल वर्धन राव यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आहारात वैविध्य राखणे तसेच भरड धान्यांपासून तयार झालेल्या अन्न उत्पादनांच्या पोषणविषयक फायद्यांविषयी संरक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये जाणीव निर्माण करणे हा या कराराचा उद्देश आहे. या करारामुळे, संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील कर्मचारी भोजनगृह, उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या इतर केंद्रांच्या मेन्यूमध्ये भरड धान्यांपासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या सहयोगी संबंधामुळे, सशस्र दलांची भोजनगृह, उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ पुरवणारी इतर केंद्रे यांच्यात कार्यरत आचारी तसेच अन्नपदार्थ हाताळणारे इतर कर्मचारी यांना अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 मधील नियमांनुसार अन्न सुरक्षा आणि स्वच्छता विषयक प्रशिक्षण मिळण्याची देखील सुनिश्चिती झाली आहे. सशस्त्र दलांमध्ये कार्यरत व्यक्तींना देशाची सेवा करताना मजबूत आणि लवचिक राहणे शक्य व्हावे म्हणून या व्यक्तींचे आरोग्य आणि स्वास्थ्य जपण्याप्रती असलेली सामायिक कटिबद्धता यातून दिसून येते. हा करार, सशस्त्र दलांतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आणि त्याहीपलीकडे साऱ्या समाजाला पोषक आहार पद्धती स्वीकारण्यासाठी, आरोग्यपूर्ण अन्नाची निवड करण्यासाठी आणि अन्नसुरक्षा राखण्यासाठी प्रोत्साहित देखील करेल.

‘हेल्दी रेसिपीज फॉर डिफेन्स’ या एफएसएसएआयने विकसित केलेल्या पुस्तकात भरड धान्यांपासून तयार करता येऊन शकणाऱ्या पदार्थांची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत विविध उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ विकणारी केंद्रे यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे माहितीचा मौल्यवान खजिना ठरणार आहे. संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना आव्हानात्मक भूभाग आणि वेगवेगळ्या हवामान स्थितीला सतत तोंड द्यावे लागते हे लक्षात घेता, त्यांच्या आहारातील वैविध्याचे महत्त्व फार मोठे आहे. भरड धान्ये त्यांच्या पोषण मूल्यांसाठी प्रसिद्ध आहेत आणि ही धान्ये उत्तमरित्या समतोल आणि वैविध्यपूर्ण आहारामध्ये लक्षणीय योगदान देऊ शकते.

संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर आरामने, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासह एमओडी आणि एमओएचएफडब्ल्यू यांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.  

 

S.Thakur/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1939193) Visitor Counter : 135