अंतराळ विभाग
चांद्रयान-3 चंद्राची नवी विहंगम दृश्ये जगासमोर आणेल -डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
11 JUL 2023 7:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जुलै 2023
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय , अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग आणि कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभाग राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की, चांद्रयान-3 चंद्राची नवी विहंगम दृश्ये जगासमोर आणेल.
भारताची याआधीची मोहीम , चांद्रयान-1 ने चंद्राच्या विविध पैलूंवर नवीन प्रकाश टाकला होता , चांद्रयान-1 या मोहिमेने चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या अस्तित्वाचा पुरावा प्रथमच जगासमोर आणला होता.असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी ईटी (इकॉनॉमिक टाइम्स) वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. आता, संपूर्ण जग चांद्रयान -3 कडे मोठ्या विश्वासाने , अपेक्षेने आणि आशेने पाहत आहे आणि त्याच वेळी चंद्र तसेच विश्वाची अनेक नवीन वैशिष्ट्ये आणि रहस्ये उलगडण्याची वाट पाहत आहे, असे ते म्हणाले.
चांद्रयान-3 मोहीम चंद्राच्या दिशेने एक पाऊल जवळ जाण्यासाठी खुणावत आहे आणि चंद्राच्या शोधात भारत इतर देशांच्या तुलनेत मागे नाही हे देखील दर्शवत आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे हे चांद्रयान केवळ चंद्रावरून चंद्राचेच निरीक्षण करणार नाही तर चंद्रावरून पृथ्वी देखील पाहणार आहे, या मोहिमेमुळे भारत चंद्रावर अंतराळयान पाठवणाऱ्या तीन किंवा चार राष्ट्रांमध्ये सामील झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
अमृत काळातील पुढील 25 वर्षांमध्ये भारताची उन्नती अंतराळातून सुरू झाली आहे आणि अंतराळ अर्थव्यवस्था भविष्यात सर्वांगीण आर्थिक विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असेल, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
या क्षेत्रात अधिक फलदायी परिणामांसाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी केवळ राष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
S.Kane/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1938783)
Visitor Counter : 183