गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांसाठी राष्ट्रीय मानके(NSCSTI) अधिस्वीकृती प्राप्त करण्यासाठी संस्थांचे अद्ययावतीकरण आणि बळकटीकरण करण्यावर भर- हरदीप सिंग पुरी

Posted On: 11 JUL 2023 4:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2023

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज विविध निकषांच्या आधारे शहरी क्षेत्रातील प्रशिक्षण संस्थांचा आढावा घेतला. संस्थात्मक संरचना, क्षमता उभारणी आणि कौशल्य विकासाची सद्यस्थिती, संस्थेची बलस्थान असलेली क्षेत्रे, अर्थसाहाय्यविषयक शाश्वतता योजना आणि सनदी सेवकांसाठी iGoT मंचावर ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांचा तपशील या निकषांवर हा आढावा घेण्यात आला. नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांसाठी राष्ट्रीय मानके(NSCSTI) अधिस्वीकृती प्राप्त करण्यासाठी संस्थांचे अद्ययावतीकरण आणि बळकटीकरण करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. या मानकांमुळे प्रशिक्षण संस्थांना 21व्या शतकात उदयाला येणाऱ्या आव्हानांना प्रभावी पद्धतीने तोंड देण्यासाठी सज्ज होता येणार असल्याची बाब केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केली.  केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आज आपल्या अखत्यारित असलेल्या 8 प्रशिक्षण संस्थांची येथे बैठक आयोजित केली. या संस्थांच्या सध्याच्या क्षमतेची पडताळणी करणे आणि मिशन कर्मयोगीच्या एकंदर उद्दिष्टांसोबत त्यांना संलग्न करणे हा या बैठकीचा उद्देश होता. सातत्याने सुधारणा करत राहण्याचे महत्त्व आणि संस्थांमध्ये नव्या कौशल्यांचा समावेश करून नागरी सेवकांच्या नव्याने निर्माण होणाऱ्या गरजांसोबत त्या सुसंगत करणे यावर यामध्ये भर देण्यात आला. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे  सचिव मनोज जोशी यांनी या संस्थांचा दर्जा आणि प्रशिक्षण देण्याची क्षमता उंचावण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रभावी कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण मानकांमध्ये ताळमेळ राखण्याचे महत्त्व देखील त्यांनी अधोरेखित केले. या संस्थांचे बळकटीकरण नागरी सेवकांच्या क्षमतावृद्धीमध्ये आणि देशाची सेवा करण्यासाठी त्यांचे सक्षमीकरण करण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावेल.

 

S.Kane/S.Patil/ P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 1938702)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu