संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी क्वालालंपूर येथे मलेशियाच्या संरक्षणमंत्र्याची भेट घेतली; आग्नेय आशियाई राष्ट्राच्या पंतप्रधानांचीही घेतली भेट


औद्योगिक सहकार्य बळकट करण्याबरोबरच संरक्षण क्षेत्रामध्‍ये द्विपक्षीय संबंध आणखी वाढवण्यासाठी विविध मार्गांविषयी प्राधान्याने केली चर्चा

Posted On: 10 JUL 2023 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जुलै 2023

भारताच्या 'अ‍ॅक्ट ईस्ट पॉलिसी'ला अधिक बळकटी  देण्यासाठी आणि मलेशियासोबतचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी, संरक्षण   मंत्री राजनाथ सिंह यांनी आज-  10 जुलैलाक्वालालंपूर येथे त्यांचे मलेशियाचे समकक्ष मंत्री  दातो' सेरी मोहम्मद हसन यांच्याशी विस्तृत चर्चा केली. त्यांनी मलेशियाचे पंतप्रधान  वायबी दातो' सेरी अन्वर बिन इब्राहिम, मलेशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दातो' सेरी दिराजा डॉ झाम्ब्री अब्द कादिर यांची  भेट घेतली.

राजनाथ सिंह, काल - 09 जुलैला रात्री  उशिरा क्वालालंपूर येथे पोहोचले. यानंतर  त्यांना मलेशियाच्या  संरक्षण मंत्रालयाच्या वतीने औपचारिक ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. यानंतर त्यांच्या अधिकृत दौऱ्यातील कामाला  प्रारंभ झाला. त्यानंतर संरक्षण  मंत्री आणि त्यांचे मलेशियाचे समकक्ष मंत्री दातो सेरी मोहम्मद हसन यांच्यामध्‍ये  द्विपक्षीय चर्चा झाली.

उभय बाजूंनी द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक विस्तारण्‍यासाठी  पुढाकार घेण्‍यावर चर्चा झाली.  विशेषत: औद्योगिक सहकार्य मजबूत करण्याचे मार्ग चिन्हित करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी परस्पर विश्वास तसेच  समान हितसंबंध आणि लोकशाहीची सामायिक मूल्ये आणि कायद्याचे राज्य यावर आधारित वर्धित धोरणात्मक भागीदारी पूर्णपणे लागू करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेविषयी पुष्टी केली.

या वर्षाच्या अखेरीस भारतात नियोजित असलेल्या मलेशिया-भारत संरक्षण सहकार्य समिती (MIDCOM) च्या पुढील बैठकीला दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शवली.  राजनाथ सिंह यांनी मलेशियन सशस्त्र दलांना त्यांच्या ‘इन्व्हेंटरी’  आधुनिकीकरण आणि देखभाल योजनांमध्ये सहकार्य करण्याची क्षमता असलेल्या भारतीय संरक्षण उद्योगाच्या कार्यावर प्रकाश टाकला.

दोन्ही मंत्र्यांनी 1993 मध्ये भारत आणि मलेशिया यांच्यात ‘एक्सचेंज ऑफ लेटर्स’ (EoL) द्वारे स्वाक्षरी केलेल्या संरक्षण सहकार्यावरील सामंजस्य करारामध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली. ही दुरुस्ती परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रात द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवण्यास सक्षम बनवेल, यावर सहमती दर्शवली.

त्यांनतर, संरक्षण मंत्र्यांनी मलेशियाचे पंतप्रधान  वायबी  दातो’ सेरी अन्वर बिन इब्राहिम यांची  भेट घेतली  आणि  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या   2019 मधील आपल्या यशस्वी भारत दौऱ्याची आठवण करून देत , मलेशियाच्या पंतप्रधानांनी त्यांना भारतातील लोकांबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा वाटत असल्याचे सांगितले आणि पंतप्रधान  नरेंद्र मोदी हे त्यांचे वैयक्तिक मित्र आहेत हे अधोरेखित करून त्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या.

मलेशियाच्या पंतप्रधानांनी उभय देशांमधील दृढ  सांस्कृतिक संबंधांची प्रशंसा केली. राजनाथ सिंह यांनी मलेशियाच्या पंतप्रधानांना यापूर्वी  झालेल्या विधायक आणि फलदायी संरक्षण संवादाची माहिती दिली.वाढते धोरणात्मक सहकार्य  पूर्ण क्षमतेने साध्य करण्यासाठीच्या  उपाययोजनांवर  या चर्चेत लक्ष केंद्रित करण्यात आले.

राजनाथ सिंह यांनी मलेशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दातो’ सेरी दिराजा डॉ झाम्बरी अब्द कादिर यांचीही भेट घेतली, या दरम्यान त्यांनी द्विपक्षीय महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय मंचावरील सहकार्याच्या मुद्यांवर विचार विनिमय केला. भारताच्या आसियानमधील मध्यवर्ती भूमिकेचे महत्त्व आणि हिंद प्रशांत  क्षेत्रातील शांतता,स्थैर्य आणि समृद्धीचे महत्त्व यावर चर्चा झाली.मलेशियाच्या संरक्षण उद्योगाच्या आत्मनिर्भरतेला गती देण्याच्या प्रयत्नांमध्ये मलेशियाला भागीदारी देण्याच्या भारताच्या आश्वासनासह या चर्चेचा  समारोप झाला.

यांनतर संरक्षणमंत्र्यांनी ,नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यासोबत  बर्मा सीमेवर लढलेले आझाद हिंद फौजेतील  99 वर्षीय निवृत्त  सैनिक सेकंड लेफ्टनंट सुंदरम यांचा सत्कार केला.

2015 मध्ये माननीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या मलेशिया भेटीदरम्यान घोषित करण्यात आलेल्या उभय देशांदरम्यानच्या धोरणात्मक सहकार्याच्या स्थापनेनंतरची ही पहिली द्विपक्षीय भेट आहे.

 

S.Patil/S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1938489) Visitor Counter : 118