राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती भवनात 10 जुलै आणि 11 जुलैला अभ्यागत परिषदेचे आयोजन


या परिषदेदरम्यान अभ्यागत परिषद 2021 चे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जाणार

Posted On: 08 JUL 2023 9:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2023

 

राष्ट्रपती भवनात येत्या 10 आणि 11 जुलै रोजी अभ्यागत परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. राष्ट्रपती 162 केंद्रीय उच्चशिक्षण संस्थांच्या अभ्यागत आहेत.

10 जुलै 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करतील. केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधानही या परिषदेला संबोधित करतील.

11 जुलै, 2023 रोजी, या परिषदेत- ‘शाश्वत विकासासाठी शिक्षण : एका उत्तम जगाची उभारणी’ या संकल्पनेवर आधारित चर्चासत्र होईल. तसेच, राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा-2020 ची अंमलबजावणी; आंतरराष्ट्रीयीकरणाचे प्रयत्न आणि जी-20; संशोधन योगदान आणि मान्यता; विविधता, समानता, एकात्मिकरण आणि सुदृढीकरण; अमृतकाळासाठी योजना आणि कृती, अशा पाच उपसंकल्पनांवर पाच वेगवेगळे गट विचारमंथन करणार आहेत. शेवटच्या सत्रात, राष्ट्रपतींसमोर, या सर्व चर्चासत्रातील निष्कर्ष सादर केले जातील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सांगता सत्राला संबोधित करतील.

10 जुलै 2023 रोजी, या अभ्यागत परिषदेची सुरुवात होण्यापूर्वी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, ‘नवोन्मेष, “संशोधन’ आणि ‘तंत्रज्ञान विकास’ ह्या विभागातील अभ्यागत पुरस्कार 2021 प्रदान केले जातील.

‘नवोन्मेष’, विभागातील पुरस्कार, पुरस्कार भौतिक आणि रसायन विज्ञान केंद्र, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ साउथ बिहार इथे कार्यरत, प्रा. वेंकटेश सिंग यांना प्रदान केला जाईल. त्यांनी सिलिकॉन फायबर शीटचा वापर करून रेझिस्टिव्ह प्लेट चेंबर डिटेक्टरसाठी स्वदेशी चार्ज पिक-अप पॅनेल विकसित केले आहे.

हैदराबाद विद्यापीठाच्या भौतिकशास्त्रातील स्कूल ऑफ फिजिक्सचे प्रा. सुरजित धारा यांना ‘भौतिक विज्ञानासाठीच्या संशोधन’ साठी अभ्यागत पुरस्कार प्रदान केला जाईल. तर सागर इथल्या डॉ. हरिसिंग गौड विद्यापीठातील प्रा. मोहम्मद लतीफ खान यांना ‘जैविक विज्ञानातील संशोधन’ साठी अभ्यागत पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

तंत्रज्ञान विकासा'साठीचा अभ्यागत पुरस्कार हैदराबाद विद्यापीठातील स्कूल ऑफ फिजिक्स (भौतिक विज्ञान विभाग) मध्ये कार्यरत प्रा. के.सी. जेम्स राजू यांना प्रदान केला जाईल. राष्ट्रपती संशोधन (भौतिक विज्ञान) साठीचा सहावा अभ्यागत पुरस्कार, याच विद्यापीठातील, रसायनशास्त्र विभागाचे  प्रा. अनुनय सामंता यांना प्रदान केला जाईल.

 

* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1938233)