मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
राष्ट्रीय मत्स्य पालक दिन 2023 सोहळा : मत्स्योत्पादन स्टार्ट अप ग्रँड चॅलेंज : भव्य स्पर्धा आणि मत्स्योत्पादन स्टार्ट अप परिषद
मत्स्योत्पादन जैवसंस्थेच्या क्षेत्रात आपल्या अद्वितीय कार्याचा ठसा उमटवणाऱ्या स्टार्ट अप्सना शोधून त्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने मत्स्योत्पादन विभागाने स्टार्ट अप इंडिया हब आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्योत्पादन स्टार्ट अप ग्रँड चॅलेंज, स्पर्धा आणि मत्स्योत्पादन स्टार्ट अप परिषद आयोजित
10 जुलै रोजी महाबलीपुरम येथे राष्ट्रीय मत्स्य पालक दिन साजरा केला जाणार आहे
Posted On:
08 JUL 2023 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2023
मत्स्योत्पादन जैवसंस्थेच्या क्षेत्रात आपल्या अद्वितीय कार्याचा ठसा उमटवणाऱ्या स्टार्ट अप्सना शोधून त्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने मत्स्योत्पादन विभागाने स्टार्ट अप इंडिया हब आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्योत्पादन स्टार्ट अप ग्रँड चॅलेंज स्पर्धा आणि मत्स्योत्पादन स्टार्ट अप परिषद आयोजित केली आहे. देशात मत्स्योत्पादन जैवसंस्था गेल्या काही वर्षांपासून वाढत असून, सध्या देशात राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये 21 मत्स्योत्पादन स्टार्टअप कार्यरत आहेत.
मत्स्योत्पादन स्टार्टअप ग्रँड चॅलेंज या स्पर्धेच्या केंद्रस्थानी चार प्रमुख समस्या क्षेत्र असून त्यावर तोडगा शोधण्यासाठी स्टार्टअप्सकडून अर्ज मागवले आहेत. या स्पर्धेसाठी 121 स्टार्टअप्सकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. संपूर्ण विश्लेषण केल्यानंतर12 स्टार्टअप्सना स्पर्धेचे विजेते म्हणून निवडण्यात आले आहे.
निवड झालेल्या स्टार्टअप्सना 10 जुलै 2023 रोजी महाबलीपुरम, तामिळनाडू येथे राष्ट्रीय मत्स्य पालक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात, मत्स्यव्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांच्या हस्ते, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री, डॉ. एल. मुरुगन आणि डॉ. संजीव कुमार बल्यान यांच्यासह विविध राज्ये आणि केंद्र आणि राज्य सरकारचे प्रभारी मत्स्यव्यवसाय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत सन्मानित केले जाईल.
निवडलेल्या स्टार्टअप्सना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत 2 लाख रुपयांचे रोख अनुदान दिले जाईल ज्यामुळे त्यांना त्यांच्या अभिनव कल्पना राबवण्यात सातत्य राखता येईल.
राष्ट्रीय मत्स्य पालक दिन सोहळा 10 जुलै 2023 रोजी तामिळनाडू मध्ये महाबलीपूरम येथे साजरा केला जाणार असून यामध्ये देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील अभिनव सर्वोत्कृष्ट कल्पना मांडणाऱ्या आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 30 स्टार्टअप्स च्या कामगिरीचे प्रदर्शन मांडले जाणार आहे, स्टार्टअप्सना त्यांचा व्यवसाय आणखी वाढवता यावा यासाठी चिंतन सत्रे देखील आयोजित केली आहेत.
* * *
Jaydevi PS/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1938150)
Visitor Counter : 148