संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॅडेट्ससाठी एक खिडकी एनसीसी एकात्मिक सॉफ्टवेअरचा केला प्रारंभ
सर्व कॅडेट्सची शून्य शिल्लक खाती उघडण्यासाठी एनसीसीने भारतीय स्टेट बँकेसोबत केला सामंजस्य करार
कॅडेट्सचा गणवेश भत्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल
Posted On:
07 JUL 2023 3:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जुलै 2023
डिजिटायझेशनला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून डिजिटल इंडिया मिशनच्या धर्तीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 7 जुलै 2023 रोजी नवी दिल्ली येथे एनसीसी एकात्मिक सॉफ्टवेअरचा प्रारंभ केला. भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस अॅप्लिकेशन्स आणि जिओ इन्फॉर्मेटिक्स बरोबर भागीदारीत एनसीसी एकात्मिक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून हे कॅडेट्ससाठी (छात्रसैनिक) एक खिडकी इंटरएक्टिव्ह सॉफ्टवेअर आहे आणि ते 'एंट्री टू एक्झिट मॉडेल' नुसार डिझाइन केले आहे.
एनसीसी एकात्मिक सॉफ्टवेअर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एकदा कॅडेट नेहमीच कॅडेट” या संकल्पनेवर आधारित आहे आणि एनसीसीमध्ये कॅडेट म्हणून नावनोंदणीच्या टप्प्यापासून ते माजी विद्यार्थी म्हणून तेथून बाहेर पडण्यासाठीच्या नोंदणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल बनवणार आहे. यामुळे प्रमाणपत्रे जारी करणे, एनसीसी कॅडेट्सचा त्यांच्या नोकरीच्या वेळी अखिल भारतीय डेटाबेस तयार करणे शक्य होणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान, एनसीसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) यांनी भारतीय स्टेट बँकेच्या “पहली उडान " योजनेअंतर्गत सर्व एनसीसी कॅडेट्सची डेबिट कार्ड, चेकबुक आणि पासबुक सुविधेसह शून्य शिल्लक खाती उघडण्यासाठी संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य कराराचा दरवर्षी सुमारे 5 लाख कॅडेट्सना लाभ मिळणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत किंवा वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत हे खाते कार्यरत राहील. हे छात्रसैनिकांना केवळ राष्ट्रीय बँकिंग प्रणालीशीच ओळख करून देणार नाही तर त्यांना त्यांच्या खात्यात निधीच्या थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक तयार व्यासपीठ देखील प्रदान करा.
सरकारच्या थेट लाभ हस्तांतरण उपक्रमांतर्गत, संरक्षण मंत्रालयाने प्रत्यक्ष गणवेश वितरण प्रक्रियेत सुधारणा करून ती अधिक पारदर्शक आणि सुलभ बनवली आहे, यामुळे एनसीसीच्या छात्रसैनिकांच्या बँक खात्यांमध्ये गणवेश भत्ता थेट बँक हस्तांतरणाच्या माध्यमातून जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा उपक्रम विद्यमान केंद्रीय खरेदी आणि वितरण प्रक्रियेची जागा घेईल. एनसीसी गणवेशाच्या तरतुदीसाठी गणवेश भत्ता आता देशाच्या अतिदुर्गम भागात असलेल्या या छात्रसैनिकांच्या बँक खात्यांमध्येही हस्तांतरित केला जाईल.
यावेळी बोलताना संरक्षण मंत्र्यांनी, एनआयसी आणि डीबीटीच्या माध्यमातून एनसीसीचे डिजिटायझेशन करण्याच्या प्रयत्नांबद्दल एनसीसी, स्पेस अॅप्लिकेशन्स आणि जिओ इन्फॉर्मेटिक्स तसेच एसबीआयच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले.या पावलांमुळे देशभरातील एनसीसीशी संबंधित माहिती निश्चितच जलदगतीने उपलब्ध होईल आणि याचा फायदा वर्तमान आणि भविष्यातील करारी छात्रसैनिकांना होईल, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केले.
संरक्षण सचिव गिरीधर अरमाने, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह, यांच्यासह मंत्रालय, एनसीसी, भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस अॅप्लिकेशन्स आणि जिओ इन्फॉर्मेटिक्स आणि एसबीआयचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
* * *
S.Kakade/S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937932)
Visitor Counter : 194